बारामती : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक काँग्रेसने लढवण्याचा निर्णय घेतला असून, हा त्यांचा संविधानिक अधिकार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असून, या जागेसाठी स्वतःचा उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. (Baramati Elections 2026)
वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता तथा राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, काँग्रेस बारामतीत पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे आणि ही आनंदाची बाब आहे.
Also Read : औरंगाबादमध्ये महिलांसाठी रोजगाराची नवी संधी; सुजात आंबेडकर यांच्या हस्ते महिला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
दरम्यान, काँग्रेसकडून या निवडणुकीत राहुल गांधी यांना प्रचारासाठी मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याचेही समजते. यावर प्रतिक्रिया देताना मोकळे म्हणाले की, जर काँग्रेसने राहुल गांधींना बारामतीत प्रचारासाठी बोलावले, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील प्रचारात उतरतील. (Baramati Elections 2026)
Also Read : औरंगाबादमध्ये वंचितचा जश्न-ए-ईद मिलन, विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधित्वासह भव् आयोजन; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती
या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीतील निवडणूक वातावरण अधिकच रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.






