Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नांदेड जाहीर सभा : ओबीसी आरक्षण आणि मुस्लिम प्रतिनिधित्वासाठी वंचित बहुजन आघाडी ठाम – सुजात आंबेडकर 

mosami kewat by mosami kewat
November 28, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नांदेड जाहीर सभा : ओबीसी आरक्षण आणि मुस्लिम प्रतिनिधित्वासाठी वंचित बहुजन आघाडी ठाम – सुजात आंबेडकर 
       
सुजात आंबेडकरांच्या जाहीर सभेला तुफान गर्दी

हदगाव : युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा नुकतीच पार पडली. नांदेडमधील या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, यावेळी मोठी जनसमुदाय उपस्थित होता.

ओबीसी आरक्षण आणि मुस्लिम प्रतिनिधित्वावर भर – 

या भव्य जाहीर सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि मुस्लिम समाजाला सर्वाधिक राजकीय प्रतिनिधित्व देऊन त्यांच्यासाठी ठामपणे उभा राहतो.”

राजकीय परिवर्तन घडवून वंचित समूहांना सत्तेत पोहोचवण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“आता आरक्षणवादी, संविधानवादी, वंचित, शोषित घटकांनी विजयाचा निर्धार करावा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून सत्ता आपल्या हातात घ्यावी.” असे सुजात आंबेडकर यांनी नागरिकांना आवाहन केले. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद आणि राज्य सदस्य अविनाश भोसीकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी वंचितांच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

सभेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: ElectionLocal body electionMaharashtraMaharashtra local body electionnandedobcObc reservationpoliticsreservationSujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

नांदेड जाहीर सभा : वंचित समूहांना सत्तेत घेऊन जाण्यासाठी ‘किनवट पॅटर्न’चा वापर करा: सुजात आंबेडकर

Next Post

मालेगाव जाहीर सभा : ‘प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवा’; सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
मालेगाव जाहीर सभा : ‘प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवा’; सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालेगाव जाहीर सभा : 'प्रस्थापित पक्षांना त्यांची जागा दाखवा'; सुजात आंबेडकरांच्या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा
article

भांडवलदारांचा थेट सत्तेकडे प्रवास: एक जागतिक धोक्याची घंटा

by mosami kewat
April 22, 2026
0

- संजीव चांदोरकर ट्रम्प यांना शिव्या न देता, मुळात लोकशाही असताना ट्रम्प त्याजागी पोचलेच कसे ? हे भारतासारख्या इतर देशात...

Read moreDetails
प्रशासनात खळबळ: नवी मुंबई महापालिका मुख्यालयातच एसीबीचा सापळा; अधिकाऱ्याला 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

प्रशासनात खळबळ: नवी मुंबई महापालिका मुख्यालयातच एसीबीचा सापळा; अधिकाऱ्याला 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

April 22, 2026
हिंदू राष्ट्राची वल्गना करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीची आणि माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची भेट !

हिंदू राष्ट्राची वल्गना करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीची आणि माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची भेट !

April 22, 2026
आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन!

April 22, 2026
बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या! सचिन जोरे; बहुजन हिताय संघातर्फे नांदेड सिटीत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर

बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या दिशेने भरारी घ्या! सचिन जोरे; बहुजन हिताय संघातर्फे नांदेड सिटीत बाबासाहेबांच्या विचारांचा जागर

April 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home