Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आरोपी डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण सुरू

mosami kewat by mosami kewat
November 19, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
आरोपी डॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण सुरू
       
अहमदनगर : कोविड काळात मयत बबनराव खोकराळे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टरांना तात्काळ अटक करण्याची आणि तपासी अधिकारी डि.वाय.एस.पी. दिलीप टिपरसे यांच्यावर विभागीय चौकशी करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडी, अहमदनगर दक्षिणतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जात आहे.

उपोषणाची सुरुवात जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने,  जे. डी. शिरसाठ, हनीफ शेख, प्रवीण ओरे, फैरोज पठाण, राजीव भिंगारदिवे, गणेश राऊत, बाबासाहेब आठवले, डॉ. सीताताई भिंगारदिवे, शोभा आल्हाट, देवीदास भालेराव, प्रतीक जाधव, प्रतीक ठोकळ, संकेत शिंदे, रियाज शेख, अजित कुऱ्हाडे, पिनू भोसले, संजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे की, न्युक्लिअस हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टरांनी बबनराव खोकराळे यांच्या प्रकरणात खोटा आरटीपीसीआर अहवाल तयार करून त्यांना कोविड पॉझिटिव्ह घोषित केले. 

त्यानंतर मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहासंदर्भात संशयास्पद हालचाली करून परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉक्टरांवर गुन्हा दाखल असूनही अद्याप अटक न झाल्यामुळे तपासी अधिकाऱ्यांकडून मोठी ढिलाई होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

आरोपी डॉक्टर खुलेआम शहरात वावरत असताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप वाढला आहे. या निष्क्रीयतेविरोधात वंचित बहुजन आघाडीने आजपासून आमरण उपोषण सुरू केले असून, “कारवाईशिवाय उपोषण उठवणार नाही” असा इशाराही देण्यात आला आहे.

Tags: ahmadnagarcovid19DoctorHealthhospitalMaharashtraVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

गडहिंग्लज नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश कांबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

पुण्यात ऐतिहासिक बौद्ध विहाराच्या तोडफोडीवरून वंचित बहुजन आक्रमक

Next Post
पुण्यात ऐतिहासिक बौद्ध विहाराच्या तोडफोडीवरून वंचित बहुजन आक्रमक

पुण्यात ऐतिहासिक बौद्ध विहाराच्या तोडफोडीवरून वंचित बहुजन आक्रमक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home