चिकलठाणा : औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने आपला जोर लावला असून, चिकलठाणा परिसरात भव्य शक्तिप्रदर्शन केले. प्रभाग क्रमांक २५ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी परिवर्तनाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

‘एक संधी वंचितला’; सुजात आंबेडकरांचे आवाहन
रॅलीदरम्यान नागरिकांना संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “औरंगाबाद शहराचा आणि चिकलठाणा परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर आता बदल घडवण्याची वेळ आली आहे. विकासाची नवी दिशा देण्यासाठी आणि सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ‘एक संधी वंचितला’ द्या. आपल्या हक्काच्या उमेदवारांना निवडून देऊन शहराच्या प्रगतीत सहभागी व्हा.”
औरंगाबाद : विश्रांती नगरमध्ये वंचितचा प्रचाराचा धडाका; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत भव्य रॅली

चिकलठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या प्रचार रॅलीमध्ये चिकलठाणा परिसरातील अबालवृद्धांसह तरुणांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. स्थानिक नागरिकांनी ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत केले.
औरंगाबादमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि वंचित बहुजन आघाडीला सत्तेत वाटा देण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

निवडणुकीच्या रिंगणात ‘वंचित’चे आव्हान
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकरांच्या या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रभाग २५ मधील या भव्य रॅलीमुळे चिकलठाणा परिसरात वंचित बहुजन आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.






