Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

तिवसा: शेतकरी आत्महत्याग्रस्त आठवले कुटुंबियांचे वंचित बहुजन आघाडीकडून सांत्वन; प्रशासनाकडून मदतीची मागणी

mosami kewat by mosami kewat
October 20, 2025
in Uncategorized
0
तिवसा: शेतकरी आत्महत्याग्रस्त आठवले कुटुंबियांचे वंचित बहुजन आघाडीकडून सांत्वन; प्रशासनाकडून मदतीची मागणी
       
सोलापूर : तिवसा तालुक्यातील सालोरा येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त आठवले कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम आणि युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांनी या कुटुंबाला धीर दिला.

सालोरा बु. येथील युवा अल्पभूधारक शेतकरी प्रवीण विश्वासराव आठवले यांनी दि. १७ ऑक्टोबर रोजी सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे निराश होऊन आपले जीवन संपवले होते. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आठवले कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला.

यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांनी तिवसा तहसीलदार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून आठवले कुटुंबियांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. आठवले कुटुंब अल्पभूधारक असून, नापिकीमुळे हातचे पीक वाया गेल्याने प्रवीण आठवले यांनी हे दुःखद पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

या सांत्वन भेटीवेळी जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांच्यासह माथाडी कामगार आघाडीचे विनय बांबोळे, अनिल सोनोने, नितीन थोरात, सतीश गणेश, किशोर तायडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: AgricultureCrop DamageFarmerMaharashtrasolapurSucideVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार; अंजलीताई आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न

Next Post

जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

Next Post
जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

जालना: पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक उत्साहात संपन्न

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी, मुस्लिम कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
बातमी

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी, मुस्लिम कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

by mosami kewat
November 12, 2025
0

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील बहुजन, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील विविध कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. हा प्रवेश सोहळा वंचित...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर!

वंचित बहुजन आघाडीकडून अकोल्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर!

November 12, 2025
मोहनराव पाटील यांचा राष्ट्रवादीला (शरद पवार गट) मोठा झटका! कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

मोहनराव पाटील यांचा राष्ट्रवादीला (शरद पवार गट) मोठा झटका! कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

November 12, 2025
वंचित बहुजन आघाडी कन्नड नगरपरिषदेच्या सर्व जागा लढवणार; उपसरपंचांसह अनेकांचा पक्षात प्रवेश

वंचित बहुजन आघाडी कन्नड नगरपरिषदेच्या सर्व जागा लढवणार; उपसरपंचांसह अनेकांचा पक्षात प्रवेश

November 12, 2025
Beed : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित परिवर्तन घडवणार – किरण वाघमारे

Beed : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वंचित परिवर्तन घडवणार – किरण वाघमारे

November 11, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home