Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

वंचित बहुजन युवा आघाडीकडून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना पाल भेट

mosami kewat by mosami kewat
November 28, 2025
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
वंचित बहुजन युवा आघाडीकडून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना पाल भेट
       
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात 25 नोव्हेंबर रोजी घडलेल्या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडी (पश्चिम) तर्फे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या कार्यालयासमोर ‘पाल भेट आंदोलन’ करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या मेसमध्ये मिळालेल्या जेवणात शिजलेली पाल आढळून आली आणि ते जेवण विद्यार्थ्यांना वाढण्यात आल्याने तब्बल 28 विद्यार्थ्यांना प्रकृती बिघडून रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकाराने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.या आधीही मेसच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी करण्यात आले होते.

तसेच आंदोलन देखील केले गेले होते. मात्र, तक्रारी, आंदोलने करून देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीने आज मंत्री शिरसाठ यांना पाल भेट देत निषेध नोंदवला.

“वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने लक्ष दिले नाही, त्यांच्या दुर्लक्षामुळेच आज हा जीवघेणा प्रकार झाला,” असे वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम अध्यक्ष राहुल मकासरे यांनी आंदोलनस्थळी वक्तव्य केले.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या :

– मेस चालकाचा ठेका तात्काळ रद्द करावा.

– विषबाधा घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करावा, वॉर्डनचे निलंबन करावे.

– मेस चालकाकडून खंडणी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करावा.

या मागण्या मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.या आंदोलनात पश्चिम अध्यक्ष राहुल मकासरे, उपाध्यक्ष निलेश बनकर, अरुण मते यांसह शेकडो विद्यार्थी मोठ्या उपस्थितीत सहभागी झाले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: Dr Babasaheb AmbedkarEducationfoodMaharashtraPal protestprotestpuneRahul makasarestudentVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

गॅस सिलेंडर’ला प्रचंड बहुमताने विजयी करा: अंजलीताई आंबेडकर यांचे मंगळवेढ्यातून आवाहन! मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

‘खाकी वर्दी उतरवण्याची’ धमकी, पोलिसाला सामूहिक मारहाण! नागपुरात भाजप उमेदवाराची गुंडगिरी

Next Post
‘खाकी वर्दी उतरवण्याची’ धमकी, पोलिसाला सामूहिक मारहाण! नागपुरात भाजप उमेदवाराची गुंडगिरी

'खाकी वर्दी उतरवण्याची' धमकी, पोलिसाला सामूहिक मारहाण! नागपुरात भाजप उमेदवाराची गुंडगिरी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‘खाकी वर्दी उतरवण्याची’ धमकी, पोलिसाला सामूहिक मारहाण! नागपुरात भाजप उमेदवाराची गुंडगिरी
बातमी

‘खाकी वर्दी उतरवण्याची’ धमकी, पोलिसाला सामूहिक मारहाण! नागपुरात भाजप उमेदवाराची गुंडगिरी

by mosami kewat
November 28, 2025
0

नागपूर : नागपूर जिल्ह्यात पोलिस शिपायाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस शिपायाला मारहाण करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी...

Read moreDetails
वंचित बहुजन युवा आघाडीकडून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना पाल भेट

वंचित बहुजन युवा आघाडीकडून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना पाल भेट

November 28, 2025
गॅस सिलेंडर’ला प्रचंड बहुमताने विजयी करा: अंजलीताई आंबेडकर यांचे मंगळवेढ्यातून आवाहन! मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गॅस सिलेंडर’ला प्रचंड बहुमताने विजयी करा: अंजलीताई आंबेडकर यांचे मंगळवेढ्यातून आवाहन! मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
नाशिकमध्ये वडार समाजाचे नेते राजू धोत्रेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

नाशिकमध्ये वडार समाजाचे नेते राजू धोत्रेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

November 27, 2025
कंधारमध्ये सुजात आंबेडकरांचा वैदू आणि वडार समाजाशी थेट संवाद; नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा!

कंधारमध्ये सुजात आंबेडकरांचा वैदू आणि वडार समाजाशी थेट संवाद; नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा!

November 27, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home