आश्वासनानंतर वंचित चे आंदोलन मागे.
अहमदनगर (प्रतिनिधी) :अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय जाचाच्या तणावातून मयत झालेल्या भटके विमुक्त समाजातील प्रा. बाळासाहेब अण्णा फुलमाळी या तिरमली नंदीवाले समाजातील कुटुंबाला न्याय न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडी संस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी दिला.
शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील मूळ रहिवासी असलेले भटके विमुक्त नंदीवाले तिरमली समाजातील प्रा. डॉ. बाळासाहेब फुलमाळी हे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या देवळाली प्रवरा येथील महाविद्यालयात नोकरीस होते २०१० पासून ते अत्यंत तुटपंजा पगारावर काम करत होते. शासनाने निर्गमित केलेल्या नियमानुसार आपल्याला पगार मिळावा यासाठी त्यांनी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्यासमोर आपली कैफियत मांडली.
परंतु त्यास संस्थेने न्याय दिला नाही. म्हणून २०२२ मध्ये त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात याचीका दाखल केली होती. सदर याचिकेचा २८ मार्च २०२३रोजी निकाल लागला. व न्यायालयाने प्राध्यापकांच्या बाजूने निकाल दिला. संस्थाचालक आणि शिक्षण संचालक यांना पे फिक्सेशन करण्यास निर्देशित केले होते. तसेच शिक्षण संचालक यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी शासकीय नियमानुसार पगार देण्याचे आदेशही संस्थेला दिले होते. परंतु असे असताना देखील संस्थेने या प्राध्यापकांना नियमानुसार पगार दिला नाही.
उलट पक्षी प्रा. बाळासाहेब फुलमाळी व इतर दोन सहकाऱ्यांना संस्थेने त्रास देण्यास सुरुवात केली. देवळाली प्रवरा येथील महाविद्यालयाच्या प्राचार्य स्वाती हापसे व संस्थेतील इतरांनी फुलमाळी यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यास सुरुवात केली.
१ ऑगस्ट २०२३ पासून त्यांना मस्टरवर सही करण्यास मज्जाव करण्यात आला. तुमचा विषय बंद करू तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू अशा पद्धतीच्या धमक्या त्यांना देण्यात येत होत्या त्यामुळे प्रा.फुलमाळी हे प्रचंड तणावाखाली नोकरी करत होते. अशा अवस्थेत २१ नोव्हेंबर रोजी पुणे विद्यापीठाच्या स्कॉड वर काम करीत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
भटक्या विमुक्त समूहातील तिरमली नंदीवाले या समाजातील प्रा. फुलमाळी हे त्यांचे कुटुंब आणि समाजासाठी एक आशेचा किरण होता. त्यांच्या पश्चात त्यांनी पत्नी सुनीता आणि दोन मुले यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले आहे. त्यांना राहण्यासाठी घर नाही उपजीविकेचे कुठलेही साधन नाही. अशा अवस्थेत संस्थेने त्यांना मा. उच्च न्यायालय व मा. शिक्षण संचालक यांच्या आदेशानुसार तात्काळ नियमानुसार पूर्ण फरकासह वेतन अदा करावे. त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर संस्थेत सेवेत सामावून घ्यावे. कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत करावी व प्रा. फुलमाळी यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या प्राचार्य स्वाती हापसे यांचे तात्काळ निलंबन करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या अहमदनगर येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या संस्थेच्या कारभारा विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आले. या आंदोलनानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, फुलमाळी कुटुंबीय व पदाधिकारी यांनी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे व सह सेक्रेटरी ॲड.आठरे पाटील यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले.
त्या नुसार प्रा.फुलमाळी यांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देणे तसेच त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे यासंदर्भात शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या नंतर संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांच्याशी भ्रमण ध्वनी द्वारे संवाद साधला.
त्यांनतर प्रा. फुलमाळी यांच्या बद्दल लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात असे आश्वासन लेखी पत्रद्वारे देण्यात आले.संस्थेचे सह सेक्रेटरी एडवोकेट विश्वास आठरे पाटील यांनी या शिष्टमंडळात दिले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे जिल्हा महासचिव योगेश साठे शहराध्यक्ष हनीफ शेख एडवोकेट योगेश गुंजाळ तसेच मयत बाळासाहेब फुलमाळी यांच्या पत्नी सुनीता फुलमाळी वडील अण्णा फुलमाळी व भाऊ राजेंद्र फुलमाळी यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे विनोद गायकवाड रवींद्र मस्के प्यारेलाल शेख,बाबुराव फुलमाळी, उत्तम फुलमाळी, गुलाब फुलमाळी, अनिल फुलमाळी, मारुती पाटोळे अण्णासाहेब गायकवाड, संजय कांबळे ,अनिल पाडळे, जे.डी. शिरसाठ, गणेश राऊत, बबलू भिंगारदिवे, प्रवीण मोरे ,योगेश गायकवाड ,सुधीर ठोंबे ,राहुल पाडळे,किशोर फतफुले आधी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.