Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाशिक शहरातील दोंदे मळ्यातील रस्त्याची दुरवस्था, वंचित बहुजन युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
September 1, 2025
in बातमी
0
नांदेड शहरातील दोंदे मळ्यातील रस्त्याची दुरवस्था, वंचित बहुजन युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नांदेड शहरातील दोंदे मळ्यातील रस्त्याची दुरवस्था, वंचित बहुजन युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

नाशिक : पाथर्डी गावातील दोंदे मळ्यातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्डे मोठे झाले असून, त्यात पाणी साचल्याने आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी वंचित बहुजन युवक आघाडीने केली आहे. त्यांनी याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन दिले असून, लवकरच रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
‎
‎दोंदे मळ्यातील रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खचलेल्या अवस्थेत आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात त्यात पाणी साचते. यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि इतर नागरिकांना ये-जा करताना मोठी गैरसोय होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डास देखील वाढले असून, साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. याचा सर्वाधिक फटका महिला आणि लहान मुलांना बसत आहे.
‎
‎या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीने पुढाकार घेतला आहे. नाशिक तालुका अध्यक्ष विकी वाकळे, महासचिव संतोष वाघ आणि पाथर्डी शाखा प्रमुख आदित्य दोंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर केले.
‎
‎निवेदनात त्यांनी महापालिकेने तातडीने नवीन रस्ता तयार करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. जर या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास, वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी धमदीप कडू मोरे, बजरंग आसाराम भोले, सुनील रामजी गायकवाड, भारत अभिमान दवंडे, सुंदर खरात, विलास तायमन, चंदर उघडे, बबन कांबळे, रामेश्वर नामदेव सहार, अतुल काळे, साई ताकतोडे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Tags: Citizen protestMaharashtranandedPoliticalProtestsVanchit Bahujan Yuva Aghadi (VBYA)vbaforindia
Previous Post

म्हाडा लॉटरी : औरंगाबादमध्ये घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली! ‎ ‎

Next Post

सोमनाथ सूर्यवंशीचा लढा देत असल्याबद्दल ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे सलगरे ग्रामपंचायतीकडून अभिनंदनाचा ठराव !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

साहित्यिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी आंबेडकरवादी संघटना काय करू शकतात, हे मोदींना पुन्हा एकदा पाहायचे आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
October 2, 2026
0

फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत PMOची दखल! मुंबई : फुले-आंबेडकरांच्या साहित्याबाबत सोशल मीडियावरील एका पोस्टची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत केंद्रीय विद्यापीठांकडून माहिती...

Read moreDetails
साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

साहिल वाकोडे प्रकरणातील तपासावर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल; आझाद मैदानावरील उपोषणकर्त्या आई-वडिलांची घेतली भेट

October 2, 2026
महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

महागाईची आग जनतेच्या डोक्यापर्यंत पोहोचली तर पंतप्रधानांची खुर्चीही जाळल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

October 1, 2026
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

October 1, 2026
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home