Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

mosami kewat by mosami kewat
February 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील खंडोबा टेकडी, पंचशीलनगर परिसरात सुरू असलेल्या रस्ते व नाले दुरुस्तीच्या कामांमुळे स्थानिक नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागातील सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी वर्गाच्या हलगर्जी कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले असून, त्या कामाकडे प्रशासनाने पुरेसे लक्ष न दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. योग्य सुरक्षितता उपाययोजना न केल्यामुळे डोंगराचा भाग घसरून घरे कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. (Ghatkopar Panchsheel Nagar protest)

या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे घाटकोपर तालुका समन्वयक समीर रत्नप्रभा रमाकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘एन’ विभाग कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

RTE प्रवेशासाठी १ कि.मी. अंतराची अट रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

आंदोलनात वॉर्ड क्रमांक १२७ चे वॉर्ड समन्वयक निखिल अशोक ठोंबरे, महिला वॉर्ड समन्वयक साक्षी वाघमारे, वॉर्ड क्रमांक १२८ च्या माजी महिला अध्यक्षा नंदा गायकवाड यांच्यासह संगीता आचार्य, आकाश वाघमारे, कविता चिलवंत, सना शेख, सविता रणदिवे, उषा सोनवणे, आशा खरात, सरसाबाई गाडगे, अविनाश अहिरे, पोपट रणदिवे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ghatkopar Panchsheel Nagar protest)

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुरक्षितता उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे सांगितले. नागरिकांच्या जीविताशी संबंधित या गंभीर प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Tags: AdministrativeFailurebmcCitizensProtestCivicNegligenceDrainageWorkGhatkoparInfrastructureCrisisKhandobaTekdiMumbaiNewsPanchsheelNagarProtestInMumbaiPublicSafetyRoadWorkUrbanSafetyvanchitbahujanaghadi
Previous Post

जालना: सेवलीकरांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरणार

Next Post

अहमदनगर : भिंगार येथील ‘बोगस’ जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

Next Post
अहमदनगर : भिंगार येथील 'बोगस' जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

अहमदनगर : भिंगार येथील 'बोगस' जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बारामतीत निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी प्रचाराला आले, तर बाळासाहेब आंबेडकरही प्रचारात उतरतील ; वंचित बहुजन आघाडीची भूमिका!
बातमी

बारामतीत निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी प्रचाराला आले, तर बाळासाहेब आंबेडकरही प्रचारात उतरतील ; वंचित बहुजन आघाडीची भूमिका!

by mosami kewat
April 8, 2026
0

Baramati Election 2026 : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक अनेक वर्षानंतर काँग्रेसने लढवण्याचा निर्णय घेतला असून, हा त्यांचा संविधानिक अधिकार असल्याचे...

Read moreDetails
कॉर्पोरेटचे लाखो कोटी 'गुंतवणूक' आणि गरिबांचे हजार रुपये 'रेवड्या'?

कॉर्पोरेटचे लाखो कोटी ‘गुंतवणूक’ आणि गरिबांचे हजार रुपये ‘रेवड्या’?

April 8, 2026
औरंगाबादमध्ये महिलांसाठी रोजगाराची नवी संधी; सुजात आंबेडकर यांच्या हस्ते महिला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

औरंगाबादमध्ये महिलांसाठी रोजगाराची नवी संधी; सुजात आंबेडकर यांच्या हस्ते महिला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

April 8, 2026
औरंगाबादमध्ये वंचितचा जश्न-ए-ईद मिलन, विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधित्वासह भव् आयोजन; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

औरंगाबादमध्ये वंचितचा जश्न-ए-ईद मिलन, विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधित्वासह भव् आयोजन; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

April 8, 2026
राहुरी पोटनिवडणूक: ९ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी मेळावा; प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

राहुरी पोटनिवडणूक: ९ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी मेळावा; प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

April 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home