Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मंत्री गिरीश महाजनांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर; पुण्यात आज जोरदार निदर्शने

mosami kewat by mosami kewat
January 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
मंत्री गिरीश महाजनांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर; पुण्यात आज जोरदार निदर्शने
       
पुणे : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप करत, पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जोरदार निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय सोहळ्यात संविधानाच्या जनकांचा अवमान झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आज दुपारी ४:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पुणे स्टेशन येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंग्स, विधानसभा व प्रभागातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता चव्हाण, युवा आघाडीचे अध्यक्ष सागर आल्हाट, माथाडी आघाडीचे विशाल कसबे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चैतन्य इंगळे तसेच रेल्वे युनियनचे अध्यक्ष पदमश्री साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

“देशाच्या संविधानामुळेच आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. अशा वेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख न करणे हा अक्षम्य अपराध आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि संबंधितांवर कडक कारवाईची मागणी करत आहोत,” अशी भूमिका शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी मांडली आहे.

Tags: ConstitutionDr Babasaheb AmbedkarequalityMaharashtraPoliticalprotestRepublic day २०२६Vanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

Nagpur : प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा स्तुत्य उपक्रम; दिव्यांगांना मोफत विमा कवच वाटप

Next Post

पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन

Next Post
पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन

पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळ: पुसद तालुक्यातील हिवळणीत पंचशील ध्वजावरून वाद, ‘वंचित’कडून गावकऱ्यांना पाठबळ
बातमी

यवतमाळ: पुसद तालुक्यातील हिवळणीत पंचशील ध्वजावरून वाद, ‘वंचित’कडून गावकऱ्यांना पाठबळ

by mosami kewat
January 27, 2026
0

यवतमाळ : पुसद तालुक्यातील हिवळणी पालमपट येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवर लावण्यात आलेल्या पंचशील ध्वज हटवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली....

Read moreDetails
पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन

पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन

January 27, 2026
मंत्री गिरीश महाजनांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर; पुण्यात आज जोरदार निदर्शने

मंत्री गिरीश महाजनांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर; पुण्यात आज जोरदार निदर्शने

January 27, 2026
Nagpur : प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा स्तुत्य उपक्रम; दिव्यांगांना मोफत विमा कवच वाटप

Nagpur : प्रजासत्ताक दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचा स्तुत्य उपक्रम; दिव्यांगांना मोफत विमा कवच वाटप

January 26, 2026
नाशिकच्या रणरागिणीला ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा; गिरीश महाजनांच्या कृतीचा जाहीर निषेध

नाशिकच्या रणरागिणीला ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा; गिरीश महाजनांच्या कृतीचा जाहीर निषेध

January 26, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home