मुंबई : देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईतील वरळी विधानसभा क्षेत्रात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. वरळी नाका येथे पार पडलेल्या या आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “मोदी हटाव – देश बचाव” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. वाढती महागाई, गॅस सिलेंडर टंचाई, सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक ताण आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. (Mumbai Protest)
या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी केंद्र सरकारने महागाई आटोक्यात आणण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.





