मुंबई : गोवंडीतील एम पूर्व वॉर्डमधील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘जन आक्रोश मोर्चा’ उद्या आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी, मोर्चा निश्चित वेळेनुसार आणि पूर्णपणे शांततेत पार पडेल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे मुंबई महासचिव सतीश राजगुरू यांनी माहिती दिली.
जन आक्रोश मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता लुम्बिनी बाग, गोवंडी येथून होणार आहे. मोर्चा सुरू करण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार आहे.
मुंबईतील जन आक्रोश मोर्चा’ एम पूर्व वॉर्ड, गोवंडी येथे समाप्त होईल. गोवंडीतील नागरिकांच्या मूलभूत आणि विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा ‘चलो गोवंडी’ चा नारा देत हा मोर्चा काढण्यात येत आहे. महासचिव सतीश राजगुरू यांनी एम वॉर्डमधील जनतेला या जन आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.





