अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली असून, उत्तर अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक ‘वंचित’च्या लोकसभा उमेदवार उत्कर्षांताई रुपवते यांच्या उपस्थितीत पार पडली.
या वेळी रूपवते यांनी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या वेळी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, महासचिव अनिल जाधव, सचिव सुनील ब्राम्हणे, जिल्हा प्रवक्ते डॉ. जालिंदर घिगे, जिल्हा उपाध्यक्ष कमाल शेख, सल्लागार मधुकर अप्पा साळवे, युवक जिल्हाध्यक्ष पश्चिम सचिन बनसोडे , प्रवीण आल्हाट, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षाताई बचकार यांच्यासह उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.