Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान

mosami kewat by mosami kewat
January 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान
       
नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला. 

महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट सवाल केला. त्यावर पोलिसांनी त्यांना तातडीने बाहेर काढले. यामुळे एकच संतापाची लाट उसळली आहे. (Vanchit bahujan aghadi)

नेमकी घटना काय?

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना, दर्शना सौपुरे (वनरक्षक) आणि माधुरी जाधव (वनविभाग) या महिला कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. महाजन यांनी आपल्या भाषणात महापुरुषांचा उल्लेख करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का वगळले? असा थेट सवाल या महिलांनी उपस्थित केला. (Republic day)

महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्यांना घोषणाबाजी करण्यापासून रोखले. महिलांना घोषणा देताना रोखण्याचे प्रयत्न यावेळी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन बाजूला केले. महिला कर्मचाऱ्यांना पोलिस स्टेशनला नेण्यात आले आहे. (Vanchit bahujan aghadi)

वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा –

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून, “आम्ही या धाडसी बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे जाहीर केले आहे. महापुरुषांचा अवमान किंवा त्यांना डावलण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक कमिटीने तातडीने पोलीस स्टेशनमध्ये जात त्या महिलांना धीर दिला आणि समर्थन दिले. त्यावेळी त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला. (Republic day)

“ज्यांच्यामुळे आज आपण हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहोत, त्या राज्यघटनाकारांचे नाव भाषणात न येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही केवळ आमचा हक्क आणि सन्मान मागितला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समानतेचे हक्क दिले आणि भारताला संविधान दिले. मात्र, मंत्र्यांच्या भाषणात बाबासाहेबांचे नाव नसणे ही लाजिरवाणी बाब आहे. मला माझ्या नोकरीची पर्वा नाही; बाबासाहेबांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उठवू. त्यांची ओळख आम्ही कधीही पुसू देणार नाही. मला निलंबित (Suspend) केले तरी चालेल, पण आज पालकमंत्री ज्या पदावर आहेत, ते देखील केवळ संविधानामुळेच आहेत, हे विसरता कामा नये.” असे दर्शना सौपुरे आणि माधुरी जाधव या महिला कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. Republic day)

Tags: ConstitutionDr Babasaheb AmbedkarFridomGirish MahajanMaharashtramlanashikNashik newsREPUBLIC DAYVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

Next Post
प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24'च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी
बातमी

प्रजासत्ताक दिनी औरंगाबादमध्ये संताप; भाजप आमदार नारायण कुचे यांच्या पुतळ्याला प्रभाग क्रमांक 24’च्या नागरिकांकडून प्रतिकात्मक फाशी

by mosami kewat
January 26, 2026
0

औरंगाबाद : भारतीय लोकशाहीचा उत्सव असलेल्या प्रजासत्ताक दिनी आज औरंगाबादमध्ये एका धक्कादायक आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या...

Read moreDetails
गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान

गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान

January 26, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण

January 26, 2026
संगीत विश्वावर शोककळा; अभिजीत मजुमदार यांचे दुःखद निधन

संगीत विश्वावर शोककळा; अभिजीत मजुमदार यांचे दुःखद निधन

January 25, 2026
अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भाजपा सोबत; वंचितचा पलटवार

अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भाजपा सोबत; वंचितचा पलटवार

January 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home