Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर विराट मोर्चा

mosami kewat by mosami kewat
August 13, 2025
in बातमी
0
मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर विराट मोर्चा

मुंबईतील रखडलेल्या SRA प्रकल्पांमुळे हजारो कुटुंबांचे हाल; वंचित बहुजन आघाडीचा SRA कार्यालयावर विराट मोर्चा

       

मुंबई : मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमुळे (SRA) बाधित झालेल्या हजारो कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी, आज वंचित बहुजन आघाडीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) कार्यालयावर विराट मोर्चा काढला. प्रकल्प पूर्ण होण्यास होणारा विलंब, भाडे थकबाकी, मूलभूत सुविधांचा अभाव आणि बिल्डर-अधिकारी यांच्यातील संगनमताच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकल्प रखडलेले असून, त्यामुळे हजारो कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अर्धवट स्थलांतर, सोयी-सुविधांचा अभाव, आणि केवळ कागदावर राहिलेली आश्वासने यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीने SRA आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मोर्चात ३५ हून अधिक एसआरए प्रकल्पग्रस्त संघटनांचे हजारो सदस्य सहभागी झाले. यावेळी मोर्चात सामील झालेल्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या हक्कासाठी आवाज उठवला. केवळ निवेदने देऊन हा लढा थांबणार नाही, तर सर्व रखडलेले प्रकल्प मार्गी लागेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.

या मोर्च्यापूर्वी नुकतीच एसआरए पीडित कुटुंबांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यावेळी नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आणि इतर कोणत्याही राजकीय पक्षाने या प्रकरणात मदत न केल्याची खंत व्यक्त केली. या प्रश्नावर फक्त वंचित बहुजन आघाडीच लढा देऊ शकते, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे आणि महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :

‎- रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प तात्काळ पूर्ण करावेत. थकलेल्या भाड्याची भरपाई त्वरित द्यावी.

– ‎गैरव्यवहार करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी.

– झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन वेळेत आणि योग्य ठिकाणी करावे.

‎- SRA प्राधिकरणाने प्रकल्पांच्या प्रगतीची स्पष्ट माहिती जाहीर करावी.

‎- ‎बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताला आळा घालावा.

‎- गरज पडल्यास शासनाने प्रकल्प स्वतः ताब्यात घेऊन कार्यवाही करावी.

‎‎प्रकल्पग्रस्त हे मुख्यतः गरीब आणि वंचित समाजातून आलेले असून, त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या लढ्यासाठी वंचित बहुजन आघाडीवर विश्वास व्यक्त करत, पीडितांनी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.


       
Tags: mumbaiprotestslumSRA officevbaforindia
Previous Post

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह

Next Post

आदिवासी तरुण जगदीश ठाकरे हत्या: चाळीसगावात वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा ‘जबाब दो’ मोर्चा

Next Post
आदिवासी तरुण जगदीश ठाकरे हत्या: चाळीसगावात वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा 'जबाब दो' मोर्चा

आदिवासी तरुण जगदीश ठाकरे हत्या: चाळीसगावात वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीचा 'जबाब दो' मोर्चा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप
बातमी

हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप

by mosami kewat
April 3, 2026
0

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजु कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कळमनुरी येथे धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली...

Read moreDetails
६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी 'वंचित' सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी ‘वंचित’ सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

April 3, 2026
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 3, 2026
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

April 3, 2026
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home