नागपूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीसाठी वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्ह्याची महत्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात व संघटित पद्धतीने पार पडली. ही बैठक राज्य कार्यकारणी सदस्य व जिल्हा प्रभारी कुशलभाऊ मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने संघटन मजबुतीकरण, कामकाज नियोजन आणि तालुका स्तरावरील रणनीती निश्चित करण्यावर सखोल चर्चा झाली.
खालील मुद्द्यांवर विशेष ठराव संमत करण्यात आले :
बैठकीतील प्रमुख ठराव –
1️⃣ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणी
– प्रत्येक सर्कलमध्ये संघटन अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन.
– बूथनिहाय कार्यकर्ते मजबूत करण्यावर भर.
2️⃣ तालुका-निहाय निरीक्षक नेमणूक
– निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण, संघटन समन्वय आणि प्रचार नियोजनासाठी निरीक्षक नेमण्याचा निर्णय.
3️⃣ तालुका-निहाय दौरे आयोजित करणे
– पक्षाच्या धोरणांची माहिती पोहोचविणे, स्थानिक अडचणी जाणून घेणे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी नियोजनबद्ध दौऱ्यांची आखणी.
बैठकीला महिला आघाडी जिल्हाध्यक्ष महानंदा राऊत, जिल्हा महासचिव सी. सी. वासे, कार्यालयीन सचिव वैभव येवले, आयटी सेल प्रमुख शुभम वाहने, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शंभरकर, राजेश जंगले, प्रा. अश्विन भगत, प्रिन्स श्यामकुळे, माधुरी खोब्रागडे, शेषराव मेश्राम, जगदीश वाडीभस्मे, नागेश बोरकर, जगदीश रंगारी, प्रदीप काळे, विनायक घुमटकर, सिद्धार्थ मेश्राम, राजेश्वर पिल्लेवान, सतीश पाटील, वसंत मडके, दीप्ती मनोहरे, बंटी पानतावणे, राजेंद्र वासनिक व सोमाजी बागडे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






