मालेगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अधिक आक्रमक झाली असून, नाशिक जिल्ह्यात पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी उद्या (दि. २० डिसेंबर २०२५) रोजी मालेगावात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने पक्षप्रवेश होणार आहे.
वंचित बहुजन आघाडी, नाशिक पूर्व जिल्ह्याच्या वतीने आयोजित या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि इतर पक्षांतील पदाधिकारी वंचितमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. दुपारी ३ वाजता, हॉटेल ग्रँड सविता, डी-मार्ट समोर, मनमाड चौफुली, मालेगाव येथे भव्य कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि नाशिक जिल्हा प्रभारी दिशा पिंकी शेख, राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत हे उपस्थित राहणार आहेत.
प्रस्थापित राजकारणाला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे पाहणाऱ्या तरुणांची आणि सुशिक्षित वर्गाची मोठी संख्या या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.






