नाशिक : भगूर गावात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या कार्यक्रमाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन दादा गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा सचिव बाळासाहेब जाधव, युवा आघाडीचे महासचिव संविधान गांगुर्डे, उपशहराध्यक्ष अमोल चंद्रमोरे, सम्यकचे जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, तसेच दिंडोरी युवा तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष प्रवेशानंतर नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेनुसार सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.
पक्ष प्रवेशानंतर नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेनुसार सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे भगूर परिसरात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.






