नागपूर : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. खापरखेडा येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात दिव्यांगांना ‘प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना’ अंतर्गत मोफत अपघाती विमा कवच आणि ‘प्रबुद्ध भारत दिनदर्शिके’चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सहारे यांच्या हस्ते झाली. त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना सहारे म्हणाले की, “दिव्यांगत्व ही दुर्बलता नसून त्यांच्यात विशेष कौशल्ये असतात. शासनाच्या योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.” (Republic day 2026)
प्रजासत्ताक दिनानिमित्त राबवण्यात आलेल्या या विमा योजनेत परिसरातील सुमारे १५० दिव्यांग बांधवांनी आपला सहभाग नोंदवला.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी जिल्हा चिचोली व चणकापूर सर्कलचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये वैभव येवले, शुभम वाहने, कविता मेश्राम, छाया सहारे, मनीषा मडकवार, नरोत्तम मडकवार, मुकेश वासनिक, कमलेश सहारे, उमेश दांडगे, मुन्ना मेश्राम, आनंद बागडे, सुरज बागडे, मिलिंद पकिड्डे, दीपक पाटील, अक्षय बोरकर व राजेंद्र गेडाम आदी उपस्थित होते.





