Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अहमदनगर : भिंगार येथील ‘बोगस’ जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
February 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अहमदनगर : भिंगार येथील 'बोगस' जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

अहमदनगर : भिंगार येथील 'बोगस' जमीन खरेदी रद्द करा! वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा

अहमदनगर : भिंगार येथील यशवंत नगर, शहापूर, केकती आणि डेअरी फार्म परिसरातील जमिनीची झालेली खरेदी बोगस असून ती तातडीने रद्द करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने प्रशासनाला सविस्तर कायदेशीर तक्रार व हरकत सादर करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, संबंधित जमीन खरेदीदार आळकुटे यांनी प्रशासनाची दिशाभूल करून आणि जमिनीचा प्रत्यक्ष ताबा नसताना खरेदी व्यवहार केला आहे. ज्या जमिनीवर गेल्या ५० ते ६० वर्षांपासून मागासवर्गीय व वंचित कुटुंबांचे वास्तव्य आहे आणि जिथे शासनाने घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर केली आहेत, ती जमीन शेतीसाठी व रिकामी असल्याचे भासवून विक्री परवानगी मिळवण्यात आली. आर.टी.एस. अपील नं. ४५१/२०२३ च्या प्रक्रियेत स्थानिक रहिवाशांना कोणतीही नोटीस न देता, त्यांना अंधारात ठेवून निकाल मिळवल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. (Bhingar bogus land deal protest)

पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

उपविभागीय अधिकारी (नगर भाग) यांनी दिलेल्या विक्री परवानगीमधील अटींचा भंग झाल्याने हा व्यवहार रद्दबातल ठरवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामा करावा आणि रहिवाशांची घरे नियमानुकूल करावीत, असेही निवेदनात म्हटले आहे. जर प्रशासनाने येत्या १० दिवसांत या प्रकरणावर स्थगिती देऊन बोगस खरेदीखत रद्द न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी व स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. Bhingar (bogus land deal protest)

जालना: सेवलीकरांच्या सुविधेसाठी अतिरिक्त तहसील कार्यालयाची मागणी; अन्यथा रस्त्यावर उतरणार

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, नगर तालुकाध्यक्ष रविकिरण जाधव, शहर महासचिव प्रवीण ओरे, भिंगार अध्यक्ष राजीव भिंगारदिवे, फिरोज पठाण, विजय कांबळे, राजू भोसले, प्रदीप कर्डक, राहुल गायकवाड, राजू भोसले, प्रवीण घाटविसळवे, महादेव भिंगारदिवे, जितिन ओहोळ, राम जगताप, सचिन पगारे, सुधीर ओहोळ, रफीक मोघल, राजू गवळी, सोनू शिंदे,सं जू पाल, प्रतिभा घाटविसळवे ,यमुना गायकवाड, जयश्री शिंदे, पदम कांबळे,बबिता सात्रळकर आदिंसह यशवंत नगर डेअरी फॉर्म मधील स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: AdministrativeComplaintAhmednagarNewsBhingarLandIssueBogusLandDealDistrictCollectorOfficeHousingRightsLandRightsLandScamAllegationLegalObjectionFiledMaharashtraNewsPeoplePowerPublicProtestAlertSocialJusticeMovementStopIllegalLandSalevanchitbahujanaghadi
Previous Post

पंचशीलनगर, घाटकोपर येथे धोकादायक परिस्थिती; ‘एन’ विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

Next Post

‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणी मुंबईतील निदर्शनांसाठी वंचित बहुजन आघाडीची पनवेलमध्ये नियोजन बैठक

Next Post
‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणी मुंबईतील निदर्शनांसाठी वंचित बहुजन आघाडीची पनवेलमध्ये नियोजन बैठक

‘एपस्टाईन फाईल्स’ प्रकरणी मुंबईतील निदर्शनांसाठी वंचित बहुजन आघाडीची पनवेलमध्ये नियोजन बैठक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बारामतीत निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी प्रचाराला आले, तर बाळासाहेब आंबेडकरही प्रचारात उतरतील ; वंचित बहुजन आघाडीची भूमिका!
बातमी

बारामतीत निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी प्रचाराला आले, तर बाळासाहेब आंबेडकरही प्रचारात उतरतील ; वंचित बहुजन आघाडीची भूमिका!

by mosami kewat
April 8, 2026
0

Baramati Election 2026 : बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक अनेक वर्षानंतर काँग्रेसने लढवण्याचा निर्णय घेतला असून, हा त्यांचा संविधानिक अधिकार असल्याचे...

Read moreDetails
कॉर्पोरेटचे लाखो कोटी 'गुंतवणूक' आणि गरिबांचे हजार रुपये 'रेवड्या'?

कॉर्पोरेटचे लाखो कोटी ‘गुंतवणूक’ आणि गरिबांचे हजार रुपये ‘रेवड्या’?

April 8, 2026
औरंगाबादमध्ये महिलांसाठी रोजगाराची नवी संधी; सुजात आंबेडकर यांच्या हस्ते महिला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

औरंगाबादमध्ये महिलांसाठी रोजगाराची नवी संधी; सुजात आंबेडकर यांच्या हस्ते महिला प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

April 8, 2026
औरंगाबादमध्ये वंचितचा जश्न-ए-ईद मिलन, विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधित्वासह भव् आयोजन; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

औरंगाबादमध्ये वंचितचा जश्न-ए-ईद मिलन, विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधित्वासह भव् आयोजन; सुजात आंबेडकर यांची उपस्थिती

April 8, 2026
राहुरी पोटनिवडणूक: ९ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी मेळावा; प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

राहुरी पोटनिवडणूक: ९ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी मेळावा; प्रकाश आंबेडकर करणार मार्गदर्शन

April 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home