Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुणे पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये ‘रक्षाबंधन’ साजरा

mosami kewat by mosami kewat
August 13, 2025
in बातमी, सामाजिक
0
पुणे पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये 'रक्षाबंधन' साजरा

पुणे पोलिसांना कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये 'रक्षाबंधन' साजरा

मावळ : पुणे शहरात तीन महिलांवर झालेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या मावळ तालुक्याच्या वतीने वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सर्व पोलीस बांधवांना आणि भगिनींना राख्या बांधून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर आणि राज्य प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या आदेशानुसार, तसेच पुणे जिल्हाध्यक्ष सीमा भालेसैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम १२ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला. मावळ तालुका अध्यक्ष मनीषा ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी, सध्याच्या परिस्थितीत पोलीस प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून, पुणे शहरात घडलेल्या घटना दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. समाजात महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी पोलिसांनी आपल्या कर्तव्याचे आणि जबाबदारीचे भान ठेवावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी या कार्यक्रमाला मनीषा ओव्हाळ (अध्यक्ष, मावळ तालुका), हर्षदा गजरमल (महासचिव, मावळ तालुका), शारदा ठुले (सचिव, मावळ तालुका), ज्योती गायकवाड (पदाधिकारी), कविता वासनिक (मावळ तालुका संघटक), बोधिमाला उके (वडगाव शहर संघटक), वैशाली गायकवाड (मोहितेवाडी महासचिव), अरुणा गायकवाड (मावळ तालुका सदस्य), सुमनताई गुणवडीकर (ज्येष्ठ कार्यकर्त्या) आणि स्नेहल चौरे (कार्यकर्ता) आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.

Tags: policeRaksha BandhanVanchit Bahujan AghadiWadgaon
Previous Post

सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण राजकीय कार्यकर्त्यांना फसवणं शक्य नाही – प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका

Next Post

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह

Next Post
डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह

डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिएतनाममधील व्यावसायिक हितसंबंधांवर आणि व्यापार करारावर प्रश्नचिन्ह

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप
बातमी

हिंगोली : कळमनुरीत वंचित बहुजन आघाडी कडून धरणे आंदोलनाची घोषणा; पोलिस प्रशासनाविरोधात संताप

by mosami kewat
April 3, 2026
0

हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजु कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कळमनुरी येथे धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली...

Read moreDetails
६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी 'वंचित' सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी ‘वंचित’ सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

April 3, 2026
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 3, 2026
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

April 3, 2026
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home