मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुर्ला तालुका कार्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भारतीय संविधानाची उद्देशिका (प्रिअॅम्बल) वाचण्यात आली, तसेच उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. ‘भारतीय संविधानाचा जयजयकार’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, विद्यार्थी, तसेच वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुक्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकत्रित उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली होती. यानिमित्ताने स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय सण सर्वांनी मिळून साजरा केला, ज्यामुळे एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर; झपाट्याने बदलले दर, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरांनी सध्या उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने वाढत असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होत...
Read moreDetails