Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Jamkhed : ‎’बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत’; ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची ॲड. अरुण जाधव यांची मागणी‎

mosami kewat by mosami kewat
September 26, 2025
in बातमी
0
Jamkhed : ‎'बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत'; ओला दुष्काळ' जाहीर करण्याची ॲड. अरुण जाधव यांची मागणी‎

Jamkhed : ‎'बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत'; ओला दुष्काळ' जाहीर करण्याची ॲड. अरुण जाधव यांची मागणी‎

       

जामखेड : बळीराजा अडचणीत तर देश अडचणीत आहे, देशातील अर्थव्यवस्था अडचणीत आहे, असा रोखठोक सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी आज शासनाला जाब विचारला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि सामान्य नागरिकांचे हाल लक्षात घेऊन त्यांनी जामखेड तालुक्यासह राज्यभर ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची आणि तातडीने मदत देण्याची मागणी केली.
‎
‎आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने करण्यात आली. ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
‎
‎यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच घरे, जीवनावश्यक वस्तू आणि हातावर पोट असलेल्या सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. “माणसाबरोबर जनावरंही मरण पावली आहेत,” असे सांगून त्यांनी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत आणि तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली.
‎
‎’आत्महत्येच्या उंबरठ्यावर शेतकरी’
‎
‎यावेळी लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ म्हणाले, “शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात गेल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे.” शासनाने जामखेड तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
‎
‎सोयाबीन, कांदा, फळबागांचे मोठे नुकसान
‎
‎निवेदनात नमूद केले आहे की, राज्यभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक दिवसांपासून पाऊस सुरूच असल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत, तर जामखेड तालुक्यात पावसाने उच्चांक गाठला आहे. सोयाबीन, कांदा व फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी व गोरगरीब लोकांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यासह राज्यभर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
‎
‎या निदर्शनावेळी लोक अधिकार आंदोलनाचे बापूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आतिश पारवे, आझाद क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव फुले, राजू शिंदे, ऋषिकेश गायकवाड, रेश्मा बागवान, कृष्णा मोरे, नागेश फुले, प्रवीण गायकवाड, अनिल कांबळे, योगेश फुले, संदीप सांगळे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       
Tags: AgricultureFarmergovernmentjamkhedMaharashtraVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

सुजात आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा: स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा

Next Post

Amravati : आशा वर्करच्या मानधन रोखण्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; तिवसा येथे ठिय्या आंदोलन

Next Post
Amravati : आशा वर्करच्या मानधन रोखण्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; तिवसा येथे ठिय्या आंदोलन

Amravati : आशा वर्करच्या मानधन रोखण्याविरोधात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक; तिवसा येथे ठिय्या आंदोलन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन
बातमी

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर? गॅस टंचाईविरोधात औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन

by mosami kewat
April 6, 2026
0

औरंगाबाद : गॅस सिलेंडर टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज औरंगाबाद येथे "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" या...

Read moreDetails
‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

‘नरेंदर, कब मिलेंगा गॅस सिलेंडर?’ गॅस टंचाईविरोधात आज राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

April 6, 2026
Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

April 6, 2026
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का - ॲड. प्रकाश आंबेडकर

भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 5, 2026
नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

नांदेडमध्ये ६ एप्रिलला ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ आंदोलन; गॅस दरवाढीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक

April 5, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home