अहमदनगर : कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद मिरजगाव गट येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या बैठकीचे अध्यक्षस्थान पक्षाचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी भूषविले.
या यावेळी जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीकरण, पक्षाचा जनसंपर्क वाढविणे आणि सामाजिक प्रश्नांवर संघर्षाची दिशा यावर सविस्तर चर्चा झाली.
ॲड. अरुण जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांना संघटनशक्ती वाढविण्याचे आणि वंचित समाजाच्या हक्कासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले. “वंचितांचा आवाज दबू देणार नाही. सामाजिक न्यायासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने लढाईत पुढाकार घ्यावा,” असेही ते म्हणाले.
बैठकीत गटातील विविध समस्यांवरही मते मांडण्यात आली. कार्यकर्त्यांनी दाखविलेला उत्साह पाहता आगामी काळात वंचित बहुजन आघाडी मिरजगाव गटात ताकदीने उभी राहणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.