प्रा. डॉ. गणेश बोरकर
संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली बेगमपु-याची संकल्पना ही आंबेडकरांची घटनेची मुळ कल्पना होय . तथागत गौतम बुध्द आणि संत रविदास यांचा वैचारीक वारसा धर्मांतराच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व बाबु जगजीवनरावावांना केले ते चर्मकार होते.
मानवतावादी समाज रचनाकार रवीदासांचा प्रभाव वाढला मोगलांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यास रवीदासांना बाध्य केले. रविदासांनी नाकारल्याने त्यांना बंदिस्त करून मेलेल्या जनावरांच्या कातडे काढणे, लष्कराला लागणा-या चामडयाच्या वस्तु तयार करणे जसे बुट, पाण्याची पिशवी वस्तूची निर्मिती करणे अशी अस्वच्छ कामे दिली पुढे हिंन्दुनी दलीत हिंदु अशी सज्ञा दिली. हा दलित हिन्दु चांभार बुवाबाजी, कर्मकांडांच्या दबावामुळे – बाबासाहेंबाच्या धर्मातरापासुन अलिप्त राहिला. बौध्दांच्या तुलनेत दलित हिंदू चांभार हा जास्त विकास करू शकला नाही.
माघ पौर्णिमा सन १३९८ रविवार रोजी वाराणसी जवळ मांडूर मध्ये सिरगोवर्धनपूर येथे रघूराम आणि रघूराणी या चांभार दाम्पत्याला पूत्ररत्न प्राप्त झाले. रविदास असे त्यांचे नाव ठेवले गेले. वाराणसी म्हणजेच काशी, बनारस जे आज उत्तरप्रदेशात आहे आणि हिंदूसाठी पवित्र धर्मक्षेत्र आहे. लक्षणीय योगायोग म्हणजे बनारस जवळच संत कबीर यांचा जन्म झाला . रविदास हे संत शिरोमणी रविदास कसे झाले ? हा प्रवास इतिहासाने जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला आहे. संत शिरोमणी रविदासांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व त्यागील त्यांची विचारधारा ही अलक्षीत राहीली आहे त्याकडे लक्ष वेधण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. सुमारे अडीचहजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुध्दांचा जन्म झाला. त्यांनी मानवाच्या दुःखांच्या कारणांचा शोध घेतला . त्यावर उपाय शोधले. त्याकाळी प्रचलीत असणा-या मनुस्मृती, वर्णव्यवस्था मानणा-या हिंदू धर्माच्या रूढी परंपरा, अनिष्ट प्रथा, भेदभाव हयांना झुगारून स्वतंत्र असा एक धर्म निर्माण केला. विज्ञानवादी आणि जाती – वर्ण भेद विरहीत दुःख मुक्त मानवसमाजाची कल्पना आहे. तथागत गौतम बुध्दांच्या विचारांचा प्रभाव हा रविदास यांच्यावर पडला. तत्पूर्वीची पार्श्वभूमी आपण समजून घ्यायला हवी.
तथागत गौतम बुध्दांच्या विचाराने रोहीदासांच्या व्यक्तिमत्वात प्रभाव दिसून येतो, तोच वारसा पुढे चालवत ते उपदेश करत लोकांचे दुःख निवारण करत. त्यांच्या उपदेशाचा प्रभाव हा वाढत होता. तत्कालीन राजेरजवाडयांना हा प्रभाव जाणवला आणि त्यांना आपल्या राजदरबारी राजगुरू असे मानाचे स्थान दिले.हिंदूस्थानातील राजसंस्थानांमधील आणि विशेषतः लोकांमधील रोहीदासांचा वाढलेला प्रभाव हा हिंन्दूस्थानावर आक्रमण करून राज्य करणा-या मोगलांना खटकत होता. हिंदुस्थानातील तत्कालीन राजेरजवाडे, संस्थाने यांच्यावर आपली सत्ता गाजवण्याचे मोगलांचे धोरण होते. संत रोहीदासांचा वाढता प्रभाव लक्षात घेउन मोगलांनी त्यांना अटक केली मोगलांनी त्यांना मेलेल्या जनावरांची कातडी (चामडे ) काढणे त्या चामडयापासुन लष्कारासाठी लागणारे बुट, पाण्याची पिशवी, शस्त्र इत्यादी वस्तु बनविणे अशी शिक्षा केली. पुढे हिंदु धर्मातही जात – वर्ण व्यवस्थेने रोहिदासिया धर्मातील लोकांना अस्वच्छ कामे करणारे म्हणून अस्पृश्य, दलित हिन्दु चांभार असे हिणवले. जाती व्यवस्थेमध्ये चांभार म्हणून संबोधण्यात येते रोहिदास या समाजाची जात चांभार नाही ते चौवर वशाचे आहेत.
रोहीदासांच्या मानवतावादी व विज्ञानवादी विचारांनी, उपदेशानी प्रभावीत होत. एकदा असेच उपदेश करत असतांना, तत्कालीन पंजाब प्रांतातील एका गावात जमलेल्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था नानक यांनी केली त्यांना उपदेश करून रोहीदासांनी लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी लंगर ही संकल्पना सांगितली रोहीदासांच्या उपदेशानुसार मार्गक्रमण करत नानकांनी शिख धर्माची स्थापना केली. गुरू नानक यांच्या गुरू ग्रंथसाहिब, धर्मग्रंथामध्ये रोहीदासांच्या दोहयांचा समावेश आहे. संत रविदासाचे मंदिराला गुरुद्वारा म्हणून संबोधले जाते.
रविदास म्हणतात..ऐसा चाहू राज मै, जहॉ मिले सबन को अन्नछोटा – बडो सब सम बसै, रविदास रहे प्रसन्न .
लहान – मोठे सगळे समान आहेत. सगळयांना अन्न व वस्त्र, निवारा मिळो भवतु सब्ब मंगलम अशी धारणा त्यांची झाली. त्यानुसार त्यांनी तथागत बुध्दाचा धम्म, त्यांची विचारधारा लक्षात घेउन स्वतंत्रपणे रोहीदासीया या धर्माची स्थापना केली पण हेतुपूर्वक हया मानवतावादी नव्या धर्माला दुर्लक्षित करण्यात आले. सनातनींना विरोध करणारे, कुप्रथा नष्ट करू पाहणारे संत रोहीदास म्हणतात.