अकोला: खामगाव येथील राहुल पैठणकर या युवकाला तुझा धर्म कोणता विचारून व गाय चोरीचा आरोप लावून अमानुषपणे मारहाण झाली.
मारहाण झालेल्या राहुल पैठणकर तब्येत सिरीयस असल्यामुळे अकोला जिल्हा रुग्णालयात आय सी यु मध्ये भरती असून वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे एड. अनवर शेरा यांनी राहुल पैठणकर व त्यांच्या आईची अकोला जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
राहुल पैठणकर यांच्या आईने वंचित बहुजन आघाडी रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ हे जिल्हा रुग्णालयांमध्ये कालपासून राहुल पैठणकर यांची योग्य काळजी घेत असल्याबद्दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले यावेळी अकोला जिल्हा रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ, युनूस पांडे, संजय किर्तक, अमोल साळवे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.