– भास्कर भोजने
कोकणातील कणकवली, प. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, बारामती, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, प. विदर्भातील अकोला यवतमाळ, अमरावती,बुलढाणा, पुर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अशा महाराष्ट्रातील सर्वच विभागात वंचित बहूजन आघाडीने नगरपालिका आणि नगरपंचायत मध्ये नगरसेवक निवडून आणतं घवघवीत यश मिळविले आहे!
हे संपूर्ण यश एकट्या वंचित बहूजन आघाडीचे स्वबळावरील यश आहे हे विशेष. कारण महाराष्ट्रातील इतर सर्व पक्ष युती आघाडी करुन लढले आहेत.
महायुती मध्ये भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट युती करून एकत्र लढले त्यांनी एकमेकांना मतांची ताकद पुरवली.
दुसऱ्या बाजूने महा विकास आघाडीच्या नावावर कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, आणि शिवसेना ऊबाठा यांनी आघाडी करुन एकत्र लढले आणि एकमेकांना मतांची रसद पुरविली.
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष युती आघाडी करुन मतांची बेरीज करून लढतं असतांना वंचित बहूजन आघाडी सोबतं कुणीही नव्हते. एकट्या वंचित बहूजन आघाडीने स्वबळावर जे यश मिळविले ते सर्वच राजकीय पक्षांच्या तुलनेत ऊजवे आहे हे समजून घेतले पाहिजे.
वंचित बहूजन आघाडीचे निवडून आलेले नगरसेवक आणि त्यांचा जिल्हा आणि प्रशासकीय विभाग बघता हेही अधोरेखित होते की, वंचित बहूजन आघाडीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला दबदबा निर्माण केला आहे. नव्हे वंचित बहूजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष असा आहे की, त्यांचे नगरसेवक सगळ्याच प्रशासकीय विभागामध्ये अर्थात, कोकण, पं. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असे सर्वदूर निवडून आले आहेत.
निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा वर्ग किंवा समाज बघितला तर हेही अधोरेखित होते की, वंचित बहूजन आघाडी हा राजकीय पक्ष ओबीसी, मुस्लिम, बौद्ध, भटके विमुक्त अशा सर्वच समाज घटकामध्ये पोहचला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थे मधील नगरपालिका, नगरपंचायत २०२५ च्या निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीने सर्वच वंचित समुहाला सत्तेत पाठविण्याचा संदेश दिला आहे.
आम्ही वैदू समाजाचा, कोल्हाटी समाजाचा नगरसेवक बनवू शकतो तसे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये सगळ्याचं वंचितांना सत्तेच्या दालनात बसवू शकतो हा अत्यंत मुलगामी संदेश वंचित बहूजन आघाडीने दिला आहे. कार्यकर्त्यांनो जागृतीचा विस्तव विझू देऊ नका. सत्तेच्या दालनात बसण्याची वेळ आली आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा ४२ वर्षाचा त्याग, समर्पण, स्वाभिमान आणि धोरण फळाला येतं आहे. सोबतीला तडफदार युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांचा झंझावात आहेच.






