अकोल्यात ‘अकोला पॅटर्न’च !
अकोला – भारिप बहुजन महासंघ ते आता वंचित बहुजन आघाडी ह्यांनी आजपर्यंत अनेक इतिहास घडविले आहेत. जो समुदाय सत्तेपासुन वंचित आहे, जो समुदाय शोषित आहे. पिढ्यानपिढ्या ज्या समुदायाला कधी राजकारणात साधी ओळखही नव्हती, अशा समुदायातील वंचित राहिलेल्यांना सत्तेची दालनं खुली करुन देत सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करून सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसवने हिच वंचित बहुजन आघाडीची आजपर्यंत ओळख आहे. आणि याच सोशल इंजिनिअरिंगला बाळासाहेब आंबेडकर यांचा ‘अकोला पॅटर्न’ म्हणतात.
जि.प. व प.स. तसेच विधानसभेमध्ये अनेक लहान लहान जाती समुहाला सत्ता मिळवुन देण हे जरी या सोशल इंजिनिअरिंगमुळे सोपं झालं असलं, तरी सहकार क्षेत्रामध्ये हे शक्य नाही, असं इथल्या प्रस्थापित व सहकार लॉबीवाल्यांकडून बोलल्या जात होते. परंतु वंचित बहुजन आघाडीने सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा अकोला पँटर्नची पुनरावृत्ती करून दाखवली.
भारिप बहुजन महासंघाचे माजी तालुकाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सुनिलभाऊ इंगळे यांच्या रुपाने पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीने निवडणूक लढवून कृषी ऊत्पन्न बाजार समिती तेल्हारामध्ये बौद्ध समाजाचे सभापती विराजमान केले.
ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे सुनिलभाऊ इंगळे यांना सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती करून सहकार क्षेत्रात वंचित समुदायालाही सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसता येते हे सिद्ध करुन दाखवले. आता पुढील निवडणुकीत खऱ्या अर्थी न घाबरता सर्वांना निवडणूक लढण्याचे बळ अकोला पॅटर्नने मिळवून दिले.
सुनीलभाऊ इंगळे आपण या सत्तेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांना योग्य मार्गदर्शन करून बाजार समितीत आजपर्यंत न राबलिलेल्या विविध प्रकारच्या लोकहिताच्या योजनांचा लाभ शेतकरी व ग्रामीण भागातील वंचित समुदायाला देवून वंचित बहुजन आघाडीचे नाव महाराष्ट्रभर गाजवाल ही अपेक्षा.