बुलढाणा : लोणार नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे (VBA) युवा नेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा लोणार येथे उत्साहात पार पडली. या सभेला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
स्थानिक समस्या सोडवण्यासाठी ‘वंचित’ला संधीसुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून लोकांना त्यांच्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी आणि परिसराचा विकास साधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला संधी देण्याचे आवाहन केले.

त्यांनी मतदारांना स्थानिक उमेदवारांना मतदान करून लोणार नगरपरिषदेची सत्ता वंचितांनी स्वतः ताब्यात घ्यावी, असे सांगितले.
लोणार नगर परिषद निवडणुकीतील ‘वंचित’चे प्रमुख उमेदवार:
अध्यक्षपदाचे उमेदवार: जहूरा बी शेख नाज अहेमद
नगरसेवक पदाचे उमेदवार: गौतम गवई, शांताबाई सरदार, महेंद्र मोरे, फिरदोस खान
सुजात आंबेडकरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, उपस्थित जनसमुदायाने मोठा उत्साह दाखवला. लोणार नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीचा सत्तेचा झेंडा फडकवणार असा निर्धार त्यांनी केला आणि विजयाचा विश्वास युवा नेते सुजात आंबेडकरांना दिला.
या सभेला लोणारमधील नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





