अक्कलकोट : अक्कलकोट नगर पालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियांका ताई मडीखांबे आणि संजाबाई ठोंबरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला आदरणीय सुजात आंबेडकर यांची प्रभावी उपस्थिती लाभली. त्यांच्या सभा संबोधनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून प्रचाराला जोम मिळाला आहे.

या कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, राज्य उपाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, युवक तालुका अध्यक्ष शिलामणी बनसोडे, तालुका अध्यक्ष विशाल ठोंबरे, कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे रविराज पोटे आणि आतिश बनसोडे, तसेच सोलापूर शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार आणि महासचिव विनोद इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेमध्ये वक्त्यांनी नगर पालिकेत पारदर्शक व सर्वसमावेशक सत्तेची गरज अधोरेखित करत विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि कामगार हक्क यांसारख्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. अक्कलकोटच्या प्रगतीसाठी वंचित बहुजन आघाडीच सक्षम पर्याय असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला.
सभेला स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अक्कलकोट नगर पालिका निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी प्रचार अधिक वेगाने तेजीत येत आहे.





