करमाळा : करमाळा तालुक्यातील साडे गावालगतच्या ओढ्याला उजनी दहिगाव उपसा सिंचनाचे पाणी सोडण्यासंदर्भात वंचित चे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी, करमाळ्याच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. अखेर या निवेदनास यश मिळाले आहे. साडे येथील चारी नंबर चार मधून गावालगतच्या ओढ्याला पाणी मिळाले.
चारीला पाणी आल्यामुळे गावकरी आणि संबधित अधिकाऱ्यांना शेतकरी यांच्यात समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
जिल्हा संघटक जालिंदर नाना गायकवाड,जिल्हा संघटक विलास कांबळे, साडे चे सरपंच मयूर पाटील, तालुकाध्यक्ष नवनाथ साळवे, महासचिव नंदू कांबळे, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, तालुका संघटक शिवाजी भोसले, संघटक बाळासाहेब कांबळे, बाळासाहेब गायकवाड,अवदुंबर पवार यांनी पाणी सोडण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
डॉ.गणेश बारकुंड, डॉक्टर देवरे, संतोष रोकडे, विठ्ठल कदगे,योगेश गोमे , संयोग पवळ, अतुल चव्हाण, अतुल सुपे,आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.