पुणे : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे.

पुणे शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींना अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मुलाखतींच्या माध्यमातून प्रस्थापित राजकारणाला सक्षम पर्याय देणारे अनेक चेहरे समोर आले असून, वंचितने पुण्यात आपली ताकद दाखवून दिली आहे.

पुणे शहराच्या विविध मतदारसंघांतून अनेक इच्छुकांनी या मुलाखतींना हजेरी लावली होती. यामध्ये केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर समाजातील तळागाळातील प्रश्न समजून घेणारे सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि सुशिक्षित उमेदवारांचा गर्दी दिसून आली.

मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनी संविधानावर आपली अढळ निष्ठा व्यक्त करत, जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची तयारी दर्शवली.






