बार्शी : रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बार्शी तालुक्यातील मांडेगावमधील ‘जयभीम बुद्धविहार’ येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका, शहर ग्राम शाखेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पालखे(अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा बार्शी शहर) हे होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव सोनावणे गुरुजी( तालुका संघटक, भारतीय बौद्ध महासभा) यांनी केले, सूत्रसंचालन राम सोनावणे( अध्यक्ष,भारतीय बौद्ध महासभा,ग्राम शाखा मांडेगाव) यांनी केले, तर आभार गावातील युवा उद्योजक उमेश मिरगणे यांनी मानले.

यावेळी, लक्ष्मण मिरगणे, सुहास पायघन,समता सैनिक दलाचे प्रवीण आखाडे, जगदीश भालेराव, सोमनाथ सोनवणे, संजय सोनवणे, सुखदेव सोनवणे, मंगल सोनावणे,पांडुरंग सोनावणे, साहेबराव ढवारे, भामा जावळे आदी ग्रामस्थ आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.