औरंगाबाद : महानगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुकुंदवाडी परिसरातील प्रभाग क्र. २४ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित भव्य प्रचार रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उमेदवारांच्या विजयासाठी सुजात आंबेडकरांचे आवाहन
प्रभाग क्र. २४ मधील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश आसाराम गायकवाड, अनुजा अमर जगताप, सुनीता रामराव चव्हाण आणि रवी भिकाजी चव्हाण यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती. रॅली दरम्यान सुजात आंबेडकर यांनी ठिकठिकाणी जनतेशी संवाद साधला.
लॉ सीईटी नोंदणीत ‘BSc’ पर्याय गायब; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, सीईटी सेलकडे तक्रार दाखल

सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महापालिकेत पारदर्शक कारभार आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुकुंदवाडीत ‘वंचित’मय वातावरण
मुकुंदवाडी परिसरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक सहभागी झाले होते. निळ्या निशाणांनी आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी सुजात आंबेडकर आणि उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

‘एक संधी वंचितला’ – मतदारांचा निर्धार
यावेळी जमलेल्या जनसमुदायाचा उत्साह पाहता, प्रभाग २४ मधील जनतेने यावेळी बदलाचे वारे वाहत असल्याचे संकेत दिले आहेत. प्रस्थापित पक्षांना बाजूला सारून “एक संधी वंचितला” देण्याचा निर्धार अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केला.






