जालना: जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एक अत्यंत भीषण अपघात घडला असून यात सहा महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. कडवंची परिसरात बुधवारी (दि. १) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. महामार्गावर काम सुरू असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने महिला कामगारांना जोरदार धडक दिली. (Samruddhi Mahamarg Accident)
या अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रकच्या चाकाखाली सापडून सहा महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रस्त्यावर रक्ताचे डाग पसरले होते. (Samruddhi Mahamarg Accident)
Also Read : नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर
घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास सुरू आहे. (Samruddhi Mahamarg Accident)
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला
Criticism Of Government : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत टीका करत, देशातील...
Read moreDetails






