जाफराबाद : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतात समता सैनिकाचे शिबिर मोठ्या प्रमाणात संपन्न होत असून त्याचाच एक भाग म्हणून जाफराबाद येथे त्यागमय माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीच्या निमित्ताने जाफराबाद न्यू हायस्कूल मैदानावर एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षक म्हणून मेजर रवींद्र पचांग यांना पाचरण करण्यात आले होते. यावेळी कुणाल दहिवले डेव्हिजन ऑफिसर व संजय मिसाळ डिव्हिजन ऑफिसर. केंद्रीय शिक्षिका सहाय्यक कंपनी कमांडर म्हणून या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक होते.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून जिल्ह्याचे सरचिटणीस राजेश सदावर्ते आणि जिल्हा संघटक प्रशिक सम्राट नवनिर्वाचित शिबीरार्थी यांची गुणवत्ता पाहून त्यांची प्रशंसा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर जिल्हा उपाध्यक्ष संजय मिसाळ, प्रकाश राऊत तालुकाध्यक्ष, प्रमोद हिवाळे तालुका सरचिटणीस, देवदास पैठणे, कोषध्यक्ष किसान गायकवाड समाधान मिसळ ,सूर्यभान घोरपडे, प्रकाश राऊत , अनिल बोर्डे हे मान्यवर उपस्थित होते.
जाफराबाद शहरात मोठ्या थाटामाटात समता सैनिक शिबिराचे समारोप करण्यात आला. यावेळी संजय मिसाळ समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा जाफराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून समता सैनिक दल ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शहरातील समता सैनिक दलाच्या वतीने राष्ट्रध्वजाला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ध्वजारोहणा नंतर जाफराबाद न्यू हायस्कूल परिसरात एक दिवसीय समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर सुरू असलेल्या समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला . समारोपात समता सैनिक दलाच्या सैनिकांनी भारतीय संविधानाची शपथ घेतली. प्रमुख विशेष अतिथी म्हणून राजेश सदावर्ते जिल्हा सरचिटणीस, प्रशिक सम्राट जिल्हा संघटक. समता सैनिक दल शहरप्रमुख पचांग सर यांनी सैनिकांना संबोधित केले.
राजेश सदावर्ते जिल्हा सरचिटणीस म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी प्रामुख्याने तीन संस्था स्थापन केल्या. भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दल यांचा समावेश आहे. तिघांचेही काम वेगळे आहे. भारतीय बौद्ध महासभा जी सामाजिक हितांचे रक्षण करेल. वंचित बहुजन आघाडी समाजाच्या राजकीय हक्कांसाठी काम करेल आणि समता सैनिक दल समाजाचे संरक्षण कवच म्हणून काम करते. समता सैनिक दलाचे अकोला युनिटचे प्रशिक्षण प्रभारी पचांग सर म्हणाले की, एक दिवसीय शिबिरासाठी आलेले समता सैनिक शिबिरार्थी यांना प्रशिक्षण दिले. प्रशिक्षक म्हणून मेजर रवींद्र पचांग. संजय मिसाळ जिल्हा उपाध्यक्ष डिव्हिजन ऑफिसर. कुणाल दहिवले डिव्हिजन ऑफिसर, समाधान खरात कंपनी कमांडर. मीनाताई झिने केंद्रीय शिक्षिका सहाय्यक कंपनी कमांडर यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीया सिबिरामध्ये २० पुरुष सैनिक ३० महिला सैनिकानी भाग घेतला रमेशया कार्यक्रमाला एसस्वी करण्यासाठी अनिल बोर्डे. सिद्धार्थ पैठनें. रंगनाथ घुसळे. लक्ष्मी प्रमोद हिवाळे. माया हिवाळे. रत्नामाला हिवाळे. कडुबाई मिसाळ. आदी महिलांनी परसराम घेऊन या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोलाची कामगिरी केली या कार्यक्रमात शिबिरार्थी म्हणून महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती