टीम प्रबुद्ध भारत –
सोलापुर: कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाज घटकावर याचा मोठा परिणाम दिसून आलाय. सलून व्यवसायिकांची बिकट अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर दि. २५ जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी नाभिक बांधवांच्या समस्या त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे पालकमंत्री यांची भेट घेऊन सलून व्यवसायिकांना दुकाने उघाडण्याची परवानगी द्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला होता. त्यानंतर २४ तासातच सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी काही अटी, शर्तींवर सलून, ब्यूटी पार्लर उघडायला परवानगी दिली. यामुळे सलून व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वंचितच्या या भूमिकेमुळे सलून व्यवसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.