Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home article

अनुसूचित जाती जमाती राखीव पदे वगळून होणारी राज्यातील पोलिस शिपाई भरती रद्द करा – वंचित बहुजन युवा आघाडी

mosami kewat by mosami kewat
November 5, 2025
in article
0
अनुसूचित जाती जमाती राखीव पदे वगळून होणारी राज्यातील पोलिस शिपाई भरती रद्द करा – वंचित बहुजन युवा आघाडी
       
राजेंद्र पातोडे 

महाराष्ट्र राज्यात २०२५ मध्ये पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई यांसारख्या विविध पदांसाठी अंदाजे १५,६३१ जागांवर भरती सुरू झाली आहे.मात्र ह्या मध्ये अकोल्यासह सात जिल्ह्यात अनुसूचित जाती साठी एकही पद राखीव नसून पाच जिल्ह्यात अनुसूचित जमाती करीता एकही पद राखीव ठेवण्यात आलेले नाही.

तीच अवस्था भटके विमुक्त, ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्गा बाबत असल्याने ही पोलिस भरती तातडीने रद्द करून आरक्षित जागा सहित नव्याने भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी गृहमंत्री  राज्यपाल आणि पोलिस महासंचालक यांच्या कडे केली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या भरती प्रक्रियेत २०२२-२३ आणि २०२४-२५ या कालावधीतील रिक्त पदे भरली जात आहेत, असे भासविले जात आहे. मात्र त्यात अकोला, सोलापूर शहर, कोल्हापूर, सांगली, नागपूर लोहमार्ग, अहिल्यानगर, गोंदिया ह्या जिल्ह्यात अनुसूचित जाती उमेदवारासाठी एकही जागा उपलब्ध नाही.

तीच अवस्था अनुसूचित जमाती उमेदवाराची आहे. नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर शहर, अहिल्यानगर आणि गोंदिया मध्ये अनुसूचित जमाती पद संख्या शून्य आहे.अनेक जिल्ह्यात भटके विमुक्त, ओबीसी आणि विशेष मागास प्रवर्गा करीता एकही जागा उपलब्ध नाही.

राज्यातील पोलिस भरतीमध्ये आरक्षण अधिनियम लागू असून, तो डावलून राज्य सरकारने ही भरती प्रकिया सुरू केली आहे.

अनुसुचीत जाती जमाती भटके विमुक्त ओबीसी ह्यांना दिलेल्या घटनात्मक अधिकाराचे हनन गुह विभाग करीत आहे. ह्याचा निषेध नोंदवत ही प्रक्रिया तत्काळ रद्द करून आरक्षित जागा सहित नव्याने ही प्रकिया सुरू करावी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा देखील वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश कडून सरकारला देण्यात आला आहे.

Tags: EducationpolicepoliticsreservationVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर!

Next Post

कळमनुरीत नारायणा पब्लिक स्कूलवर RSS मार्फत अल्पवयीन मुलांना धार्मिक प्रशिक्षण; वंचित बहुजन आघाडीची कारवाईची मागणी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
संविधान सन्मान महासभेतून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भाजप – आरएसएसवर जोरदार प्रहार!
बातमी

संविधान सन्मान महासभेतून ॲड. प्रकाश आंबेडकरांचा भाजप – आरएसएसवर जोरदार प्रहार!

by mosami kewat
November 25, 2025
0

ॲड. प्रकाश आंबेडकर : मोहन भागवत हिटलर - मुसोलोनी तुमचा आदर्श! मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आयोजित संविधान...

Read moreDetails
इस देश में रहना होगा, तो संविधान को मानना होगा : सुजात आंबेडकर

इस देश में रहना होगा, तो संविधान को मानना होगा : सुजात आंबेडकर

November 25, 2025
मुंबईत संविधान सन्मान महासभेत संविधानाचा जागर

मुंबईत संविधान सन्मान महासभेत संविधानाचा जागर

November 25, 2025
मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवर उपस्थित राहणार

मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवर उपस्थित राहणार

November 25, 2025
मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबईत आज संविधान सन्मान महासभा; संविधानप्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

November 25, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home