मुस्लीम विद्वान आणि ‘वंचित’ चे विभागीय आयुक्तांना निवेदन !
औरंगाबाद: मुंबईच्या घाटकोपर भागातून मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण देण्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. या विषयाला अनुसरून औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या नेतृत्वात तमाम मुस्लीम विद्वानांनी आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्रित येऊन विभागीय आयुक्तांकडे मौलाना सलमान अजहरी यांना सोडून देण्यात यावे यासाठी निवेदन दिले आहे.
त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून मुस्लिम समाजाविषयी गरळ ओकण्याचे काम टी.राजा सिंग, नितेश राणे, कालीचरण महाराज इत्यादी करत असून त्यांच्यावर कित्येक वेळा 153 गुन्हे दाखल असून त्यांना एकदाही अटक करण्यात आली नाही. मात्र, मुस्लिम धर्म विद्वान मौलाना सलमान यांना एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे गुजरात एटीएस कडून मुंबईच्या घाटकोपर येथून अटक करण्यात आली आहे.
आम्ही या अटकेचा जाहीर निषेध करतो आणि आपल्यालाही विनंती करतो की इस्लाम धर्म अभ्यासक मौलाना सलमान आजारी यांची तात्काळ सुटका करण्याकरिता ट्रान्सलेट रिमांड रद्द करण्यासाठी माननीय उच्च न्यायालयात अखिल दाखल करून मौलाना सलमान यांची त्वरित करावी असेही यामध्ये म्हटले आहे.
या निवेदनावर, अशोक हिंगे पाटील (वंचित बहुजन आघाडी मराठवाडा अध्यक्ष), अमित भुईगळ (प्रदेश युवा सदस्य आघाडी), जावेद कुरेशी (अध्यक्ष मुस्लिम इत्तेहाद फ्रंट), तय्यब जफर (मराठवाडा सचिव), जितेंद्र शिरसाट (मराठवाडा कार्यक्रम प्रमुख), महेश निनाडे (मराठवाडा मुख्य संघटक), प्रभाकर बकले (पूर्व जिल्हाध्यक्ष), योगेश गुलाबराव बन (पश्चिम जिल्हा अध्यक्ष), सतीश गायकवाड (युवा जिल्हाध्यक्ष), लताताई बामणे (महिला जिल्हाध्यक्ष), वंदनाताई नरवडे (महिला शहर अध्यक्ष), मतीन पटेल (पूर्व शहराध्यक्ष), संदीप शिरसाट (पश्चिम शहराध्यक्ष), जलीस अहमद (शहर अध्यक्ष), अफसर पठाण (पूर्व युवा शहराध्यक्ष), संदीप जाधव (मध्य युवा शहर अध्यक्ष) यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.