Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

वास्तव आणि प्रतिनिधित्व

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 5, 2021
in सामाजिक
0
वास्तव आणि प्रतिनिधित्व
0
SHARES
522
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

मानवाचा आधुनिक इतिहास या वळणावर एक भय-चित्रपट बनत आहे. कार्यकारणभाव परिणामशून्य झाला आहे आणि तर्क अर्थहीन. दररोज आपले मित्र, नातेवाईक किंवा ओळखीचे लोक आजारी पडल्याचे किंवा एखाद्याचे निधन झाल्याचे आपण ऐकत आहोत.  २०२० मधील विनाशकारी लॉकडाउनमुळे, बरेच जण आत्यंतिक दारिद्रयात ढकलले गेलेत. आधीपासूनच ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेवरती न भरून येणारे आघात झालेत आणि पुन्हा एकदा आपण अकार्यक्षम आणि निर्दयी शासनाचे बळी ठरत आहोत. रोज रात्री, टेलीव्हिजनच्या पडद्यावर भीतियुक्त गोष्टी पाहणारा व्यक्ती, विचार करत असेल की ,आपण आपले जीवन या निरर्थक आणि भ्रष्ट सरकारला कसे दिले.  असं जाणवतं की, जे लोक सत्तेत आहेत, ज्यांच्यावर जनतेच्या हिताची अधिकृत जबाबदारी आहे त्यांच्यापेक्षा चित्रपट निर्मात्यांना सद्यपरिस्थितीची चांगली जाणीव आहे.

अमेरिकन दिग्दर्शक स्टीव्हन सोडरबर्ग यांनी २०११ मध्ये बनवलेली Contagion (संसर्ग) हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच आताच्या कोविड-१९ या महामारीची तेव्हा दिलेली भविष्यवाणी वाटते. ज्यामध्ये अकल्पित विषाणूने जगाचा ताबा घेऊन जागतिक महामारी आणलेली आहे ,असं चित्रण आहे. चित्रपटाची नायिका बेथ एम्हॉफ कामानिमित्त हाँगकाँगला जाते. माघारी  मिनियापोलीझला परतण्याआधी शिकागोमध्ये तिच्या जुन्या प्रियकराला भेटते.  दोन दिवसांनंतर तिचा आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा अचानक मृत्यू होतो. लवकरच, जपान, नायजेरिया आणि जगाच्या इतर भागात माणसं किडा मुंगी सारखी मृत्य पावतात. विषाणू नियंत्रणाबाहेर जातो आणि उपचारासाठी धडकी भरवणारा लशीचा शोध सुरू होतो. चित्रपटाचा शेवट आनंददायक नाही, त्यामध्ये कोणत्याही लशीचा चमत्कारिक शोध नाही, मानवी विज्ञानाचा निसर्गाच्या गूढ शक्तींवर विजय नाही. चित्रपटाचा शेवट हा संदिग्ध आहे –  ‘हे रोजचच आहे’ म्हणून ज्याला आपण जगण्याचा भाग बनवतो ती न्यू नॉर्मल स्थिती कायम राहते. विषाणू विरुद्ध लढा निर्णायक टप्प्यावर पोहचतच नाही.

एखाद्या अतिवास्तव, वाईट जगाचे चित्रण करणाऱ्या अनादर्शवादी चित्रपटाप्रमाणे

मा गच्या वर्षी करोना विषाणू विरुध्द संरक्षण म्हणून प्रांतामाघून प्रांत आपण बंद केले. हा विषाणू अजेय योद्धा म्हणून अवतरला. त्याच्या अंगावर असणारे गोलाकार मुकूट हे न दिसणाऱ्या हजारों तलवारीसारखे काम करतात. लोकांनी स्वतःला बंदिस्त केले, राज्यकर्त्यांनी सीमांच्या तटबंदींना टाळे ठोकले आणि छोट्याश्या फटीमधून संपूर्ण मानव समुदाय किलकिल्या नजरेने  जगाकडे डोकावून पाहत होता.  रोजची धावाधाव, गडबड-गोंगाट त्यामुळे आलेला शतकानुशतकांचा थकवा जमिनीवर पसरणाऱ्या दवबिंदू सारखा स्थिरावत होता.  आणि कोणीतरी  कोठेतरी दिवे बंद करून खूप भीतिदायक अंगाईगीत गुणगुणत होता, आपल्या थकलेल्या शरीरांना सूचित करण्यासाठी की, आता तुम्ही कायमचे आडवे पडा आणि विश्रांती घ्या.

आता आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊ, एक असे कलात्मक उपकरण ज्याद्वारे भूतकाळ पाहता येतो ,असं म्हणतात. दिग्दर्शक सोडरबर्ग चीनमधील पाम झाडांवरती फिरणारे बुलडोझर, जंगल कटाईमुळे ज्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाले ती वटवाघुळे चित्रपटात दाखवतात. त्यातील एक

वटवाघूळ वराह शेतीमध्येत राहायला जातं, तिथ ते विषाणू संक्रमित केळाचा तुकडा खाली पाडतं, तो तुकडा एक डुक्कर खातं, त्या डुकराला कत्तलखान्यात नेण्यात येतं, मकाऊ येथील कसिनो मध्ये ते शिजवलं जातं, शेफ मार्फत चित्रपट नायिका बेथ एम्हॉफकडे व्हायरस संक्रमित होतो.  आता त्याच्यानंतर…  जसे काही लोक म्हणतात, ते आजचं आपलं वास्तव आहे.

सोडरबर्गच्या आधी काही दशकांपूर्वी, डॅनिश दिग्दर्शक लार्स वोन ट्रियर यांनी १९८७ साली   Epidemic (महामारी ) हा भयपट बनवला होता, ज्यात लार्स आणि नील या दोन पटकथालेखक यांनी प्लेग सदृश महामारीवर पटकथा लिहिण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या पटकथेचा नायक हा मेस्मर नावाचा डॉक्टर असतो. एका निनावी शहरातील त्याच्या अध्यापकाच्या इच्छेविरुध्द तो ग्रामीण भागातील लोकांना उपचार देण्यासाठी जातो. पण, तो रोग मेस्मर आणि त्याच्या जवळ असणाऱ्या वैद्यकीय सामानामुळेच पसरत जातो. दरम्यानच्या काळात, त्यांच्या पटकथे मध्ये वर्णन केल्यासारखाच एक आजार वास्तविक जगात पसरायला लागतो; अखेरीस, पटकथाकार निल्सदेखील त्या आजारास बळी पडतो. कदाचित, लार्स वोन ट्रीयर यांनी आधीच कल्पना केली होती की ,काल्पनिक प्रतिनिधित्व पडद्यापलीकडे जाऊन खऱ्या जगात  संचार करू शकते. एखाद्या व्यक्तीची अनादर्शवादी कल्पनाशक्ती संपूर्ण संस्कृतीचा इतिहास बनू शकते.

ग्रीक रिपब्लिक मधील कवी आणि चित्रकारांवर बंदी घालावी या मतासाठी तत्त्ववेत्ता प्लेटो प्रसिद्ध होता; त्याच्या मते, कवी अथवा चित्रकार हे त्यांच्या कलेतून जगाचं जे चित्रण अथवा रेखाटन करतात ते मुळात मूलभूत जग नसते, तर त्याच्या केवळ प्रतिकृती असतात. भरताच्या नाट्यशास्त्रात असं दिल आहे की, नाट्याचा उगम हा असुर आणि रंगमंचावरील नट यांच्यातील भांडणातून झाला. भारतीय रंगभूमीवरील पहिलं नाटक समुद्रमंथनाच्या वेळी सदर करण्यात आलं. त्यात असुरांचे चित्रण देवांविरुध्द पराजित झालेले असं करण्यात आलं. नाटकाचा शेवट वेगळा  व्हावा ही मागणी करत असुरांनी राग आणि उद्विग्नतेने नटांवरती हल्ला केला. भांडण मिटवण्यासाठी सृष्टी निर्माता ब्रम्हाला बोलावण्यात आलं. त्याने हे घोषित केल की, नाटक आणि सादरीकरण हे वास्तविक जगापासून वेगळे असायला पाहिजे. वास्तव आणि प्रतिनिधित्व यातील फरक समजण्यासाठी असुर आणि इतर प्रेक्षकांसाठी हा एक मूलभूत धडाच होता! लेखक, कलाकार आणि चित्रपट निर्माते यांना आपले वास्तव जीवन आणि त्याचे अभिव्यक्तीच्या वेगवेगळ्या प्रकारांमधील चित्रण, रेखाटन, वर्णन अथवा प्रतिनिधित्त्व यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी विशिष्ट दृष्टीची आवश्यकता असते त्यासाठी ते चिवटपणे झुंजत असतात.

इतिहासातील अशा ठिकाणी आपण उभे आहोत जिथे हे प्रश्न पुन्हा डोके वर काढत आहेत. आपल्या जगाचं आकलन करून घेण्यासाठी जे मापदंड आपण निर्माण केले होते ते आता कूचकमी ठरत आहेत. असं वाटत आहे की, आपण सिनेमा आणि साहित्याने कल्पिलेली दुःस्वप्ने, अनादर्शवादी भोवताल सद्यघडीला वास्तवात जगत आहोत अनुभवत आहोत.   

पण, दुसर्याच वेळी असे म्हणावेसे वाटते की,आपण ज्या तीव्र वेगाने स्वयं-विनाशाकडे मार्गक्रमण करत आहोत त्यापासून वाचण्यासाठी निसर्ग, अतिरेकी उपभोग आणि माणूस यातील संबंध मूलभूतपणे बदलावे लागतील. आज एखादा असा विचार करू शकतो की याला खूप उशीर तर झाला नाही ना! खरे तर या बदलासाठी, समृद्ध जगाच्या, आदर्शवादी कल्पना साहित्य आणि चित्रपटांमध्ये सर्वप्रथम आणल्या पाहिजेत. तरच त्या प्रत्यक्षात उतरतील.

उगाच नाही आपल्या पूर्वजांनी विपुल प्रमाणात आदी-मातेच्या कल्पना केल्या, शिल्पे काढली, चित्रे रेखाटली! त्यांना माहीत होते की, जीवन हे प्रतिनिधित्वाचे अनुसरण करत असते.   

टीप : संस्कृती सिद्धांतकार स्टूआर्ट हॉल प्रतिनिधित्वाची व्याख्या करताना म्हणतात, प्रतिनिधित्व म्हणजे अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे संस्कृतीच्या सदस्यांमध्ये, ‘भाषा, चिन्हे, आणि प्रतीमांद्वारे’ अर्थाची निर्मिती आणि देवाणघेवाण होते. ‘भाषा, चिन्हे, आणि प्रतीमा’ या वास्तव जगातील गोष्टींचे प्रतिनिधित्व करत असतात.

वाचकांना समजण्यासाठी अनुवादकाने वरील व्याख्या दिली आहे.

लेखिका: रश्मी सहानी

अनुवादक: पृथ्वीराज शिंदे


       
Tags: cinemareviewrashmisahney
Previous Post

पिंपरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

Next Post

अन्याय ग्रस्त खेरडा ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आरोपीला हद्दपार करा – डॉ.सुरेश शेळके

Next Post
अन्याय ग्रस्त खेरडा ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आरोपीला हद्दपार करा – डॉ.सुरेश शेळके

अन्याय ग्रस्त खेरडा ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आरोपीला हद्दपार करा - डॉ.सुरेश शेळके

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क