सोलापूर : शहरातील नामवंत व जनसंपर्क असलेले माजी नगरसेवक रवि (बॉस) गायकवाड यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष व सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडी, तसेच यशपाल सोनकांबळे, यशवंत इंगळे, चंद्रकांत शिंगे, बनसोडे, राजकुमार वाघमारे, अशोक कल्लाप्पा शिंगे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
रवि गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीस सोलापूर शहरात नवी ताकद प्राप्त झाली असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये या प्रवेशाचा मोठा परिणाम दिसून येईल, अशी भावना पक्षातील पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.






