Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बोगस बियाणे विरोधात दाखल तक्रारीवर महाबीज अधिकारी ह्यांना देखील अटक करून शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्यात यावी – राजेंद्र पातोडे 

mosami kewat by mosami kewat
August 30, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बोगस बियाणे विरोधात दाखल तक्रारीवर महाबीज अधिकारी ह्यांना देखील अटक करून शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्यात यावी – राजेंद्र पातोडे 
       
मुंबई : राज्यातील शेतकऱ्याची फसवणूक करणारे सदोष आणि बोगस बियाणे विक्रेते खाजगी कंपन्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून अशाच तक्रारीवर महाबीज अधिकारी ह्यांना देखील अटक करून शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

सदोष बियाणे आणि उगवण न झाल्याचे राज्यात १७,४७३ तक्रारी आहेत. त्यात प्रत्यक्ष पाहणी १०००० शेतकऱ्यांची करण्यात आली असून तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने १०,११३ प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी पूर्ण केली असा दावा केला जातो. ७,८११ बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले, ज्यापैकी १,०८२ नमुने अप्रमाणित निकृष्ट दर्जाचे आढळले.त्यात सरकारी कंपनी महाबीज चे देखील बियाणे आयात.त्यावरून फक्त खाजगी कंपन्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या अहवालांच्या आधारे दोषी कंपन्यांवर आतापर्यंत ८५ गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत.

राज्यभरात दाखल झालेल्या ८५ गुन्ह्यांमध्ये, सर्वाधिक ७५ अमरावती विभागात दाखल आहेत. अनेक खाजगी कंपन्यांचे संचालक, व्यवस्थापक आणि बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या वितरकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे व काहींना अटक करण्यात आली आहे.

शासकीय संस्था महाबीजच्या विरोधात लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि जालना या जिल्ह्यांतून सर्वाधिक १,००० हून अधिक तक्रारी आल्या आहेत. परंतु, महाबीजच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही. खाजगी कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल केले जात असताना, महाबीजला मात्र कृषी विभागाने स्वतःहून अंतर्गत चौकशी करण्याची आणि शेतावर जाऊन पाहणी करण्याची सवलत दिली आहे.

महाबीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट अटकेची कारवाई झालेली नाही. महाबीज प्रशासनाने दोषी लॉट्सच्या शेतकऱ्यांना बियाणे बदलून देणे किंवा रोख परतावा किंमत परत करणे देण्याचे धोरण राबवले आहे.हा चोराला चौकशी करण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासारखे आहे.खाजगी कंपन्यांप्रमाणेच महाबीजच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई आणि अटकेची मागणी वंचितची आहे.सोबतच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील वंचितने केली आहे.

Tags: AgricultureFarmerLadki Bahin Scheme MaharashtraMaharashtraPoliticalSeedsVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

४२ वर्षांपासून नरंगलच्या प्लॉट वाटपाचा प्रश्न रखडला; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

झी उद्योग समूह, सुभाषचंद्र गोयल, ९९.९७ टक्के हेयर कट, अण्णा आंदोलन, बँकेवर दरोडा घालणारे दरोडेखोर….त्या दरोडेखोरांनी शेजारच्या गल्लीत घातलेला राडा !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home