Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका

mosami kewat by mosami kewat
July 21, 2025
in बातमी
0
पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका

पुण्याजवळ वेद विहार समोर भीषण अपघात; रिक्षा चालकाची थरारक सुटका

पुणे : पुणे-बंगळूरु महामार्गावर, वेद विहारसमोर रविवारी रात्री एका भीषण अपघातात MH 12 QR 4621 क्रमांकाची रिक्षा रस्त्याच्या दुभाजकावर आदळली. या अपघातात रिक्षाचालक, गणेश कोळसकर (वय ३५), रिक्षातच अडकून पडले. मात्र, आपत्कालीन यंत्रणांच्या तत्परतेमुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
‎
‎अपघाताची माहिती मिळताच वारजे अग्निशमन दल, NDA अग्निशमन केंद्राची फायर गाडी, आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने स्प्रेडर कटरच्या साहाय्याने रिक्षेत अडकलेल्या गणेश कोळसकर यांचे दोन्ही पाय मोकळे केले आणि त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर, कोणतीही वेळ न घालवता त्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
‎
‎या बचावकार्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून अपघातग्रस्त रिक्षा तात्काळ रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. अग्निशमन अधिकारी सुनील नामे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हे बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले. या टीममध्ये फायरमन विजय स्वामी, बाळू तळपे, आशिष सुतार, कोंडीबा झोरे, भंडारी, जांभळे तसेच ड्रायव्हर गोडसे, कलशेट्टी आणि चौरे यांचा मोलाचा सहभाग होता.
‎

Tags: accidentAutopuneVed Vihar
Previous Post

मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर कायम; अंधेरी सबवे बंद

Next Post

मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

Next Post
मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

मोठी बातमी! बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना
बातमी

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडरच्या टंचाईने घेतला तरुणाचा बळी; तिवसा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

by mosami kewat
April 2, 2026
0

Gas Cylinder Shortage : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांवर बसत आहे. वाढती किंमत आणि बुकिंग कालावधीतील वाढ...

Read moreDetails
सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

सिलेंडर टंचाई, महागाई आणि बेरोजगारीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर जोरदार हल्ला

April 2, 2026
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

April 2, 2026
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 1, 2026
तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home