Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 31, 2023
in बातमी
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा!
0
SHARES
54
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

क्रूर आणि अमानुष जातीय अत्याचाराच्या विरोधात लढा सुरूच राहील!

मुंबई : राज्यात दर दिवशी कुठे ना कुठे जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे दलित तरुणांना झाडाला उलटे टांगून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच साताऱ्यातील माण येथे एका दलित महिलेला रस्त्यात फरफटत नेऊन लाथा बुक्क्यांनी, काठी आणि उसाने अमानुष मारहाण झाल्याची अत्यंत क्रूर घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संतापीत झालेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सोडणार नाही’ अशा कडक शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खडसावले आहे.

“साताऱ्यात एका दलित विधवेला ४ पुरुषांनी क्रूरपणे मारहाण केली. तिचा गुन्हा काय? तर तीने वैरणीसाठी, म्हणजे गुरांच्या चाऱ्यासाठी पैसे दिले होते पण, चारा न मिळाल्याने तिचे स्वतःचे पैसे ती परत मागत होती म्हणून. तिला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ इतका विचलित करणारा आहे की, या जातीय अत्याचाराचे वर्णन करण्यासाठी मला शब्द ही सापडत नाहीयेत. अगदीच क्रूर आणि अमानुष.” अशा शब्दात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी साताऱ्याच्या घटने संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तसेच या पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला भेटून आधार देणारा आणि मदतीला धाऊन जाणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिला पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. “आम्ही प्रभावीपणे हा मुद्दा मांडल्यामुळे या प्रकरणात ॲट्रोसिटी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करावा लागला आणि त्या ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली. आमच्या स्थानिक नेतृत्वाने काल तहसीलदारांना आमच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. आजही हा न्यायचा लढा चालू ठेवत या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत.” असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

शेवटी “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस हे वाचत असतील अशी मी आशा करतो, कारण, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही सोडणार नाहीत.” अशा शब्दात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी खडसावले आहे.

ट्विट

It does not stop, does it?

A helpless Dalit widow was brutally beaten by a group of men in Satara, Maharashtra.

Her crime? She demanded her own money back which she paid for undelivered goods — fodder.

The video of the physical abuse is so disturbing that I am struggling to… pic.twitter.com/PUoywPtGon

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 31, 2023

VBA was the FIRST political party to come to the victim’s and her family’s aid and meet them and offer our support.

Our effective representation ensured that the case was registered under the PoA of SC/ST Act and the 4 accused men are caught by the police.

Our local leadership… pic.twitter.com/2ecsJwkTs1

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 31, 2023


       
Tags: Caste atrocityMaharashtraPrakash AmbedkarSataraVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

श्रीरामपूरमधील पीडित कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केली फोनवरून विचारपूस!

Next Post

लढणारे मेले तर लढणार कोण? सत्ता हातात घ्या आणि आपले प्रश्न सोडवा – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
लढणारे मेले तर लढणार कोण? सत्ता हातात घ्या आणि आपले प्रश्न सोडवा – ॲड. प्रकाश आंबेडकर

लढणारे मेले तर लढणार कोण? सत्ता हातात घ्या आणि आपले प्रश्न सोडवा - ॲड. प्रकाश आंबेडकर

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !
विशेष

सिद्धार्थ कॉलेजमुळेच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो !

कालकथित सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी वेळोवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले आहेत. ते ज्यावेळी कुर्ला येथे ...

February 15, 2025
शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!
विशेष

शब्दांनो, थोडे मोठे व्हा…बा भीमा – रमाईची प्रेमकहाणी तुमच्यात मावत नाही..!

- आकाश मनिषा संतराम संपूर्ण जगभरात आजचा दिवस म्हणजे 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. विशेषतः तरुण ...

February 14, 2025
तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म
सामाजिक

तथागत गौतम बुध्द आणि संत रविदासांचा – रोहिदासीया धर्म

प्रा. डॉ. गणेश बोरकर संत रोहीदास हिंदू नव्हते त्यांनी विज्ञानवादी रोहीदासीया समाजाची रचना केली आहे. ६२३ वर्षापूर्वी संत रोहीदासांनी मांडलेली ...

February 14, 2025
धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?
बातमी

धस साहेब….तर तुम्ही अशाच पद्धतीने माफ केलं असतं का?

सोमनाथ सुर्यवंशीच्या आईचा सवाल ! परभणी : सोमनाथच्या मारेकर्‍यांना माफ करा, असे आ.सुरेश धस साहेब तुम्ही कसे काय म्हणू शकता? ...

February 11, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क