Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

भाजपचा मनसुबा लोकशाही संपवण्याचा! ५ हजार रुपयांसाठी लोकशाही स्मशानात नेणार का? – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

mosami kewat by mosami kewat
December 17, 2025
in Uncategorized, बातमी, राजकीय, सामाजिक
0
भाजपचा मनसुबा लोकशाही संपवण्याचा! ५ हजार रुपयांसाठी लोकशाही स्मशानात नेणार का? – ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल
       

कोल्हापूर : “देशातील लोकशाही टिकवण्यासाठी राजकीय पक्ष जिवंत राहणे आवश्यक आहे. मात्र, सध्या भारतीय जनता पक्ष इतर सर्व राजकीय पक्ष संपवण्याचे राजकारण करत आहे. मतदारांना ५-५ हजार रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण, २०- २५ हजार रुपयांसाठी तुम्ही तुमची लोकशाही स्मशानात नेणार का?” असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरकरांना विचारला.

कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर आयोजित ‘विजयी संकल्प महासभेत’ ते बोलत होते. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

‘समझोत्यांचे राजकारण’ पक्षांचा ऱ्हास करणारे –

महानगरपालिका निवडणुकांच्या धावपळीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, १३० जागांच्या सभागृहात अनेक पक्षांकडे १३० उमेदवारही नाहीत. अशावेळी केवळ जागा भरण्यासाठी राजकीय समझोते केले जात आहेत. “या समझोत्यांमुळे काही ठिकाणी पक्ष जिवंत राहिले, तर काही ठिकाणी ते कायमचे संपले. सत्ता मिळवणे हेच एकमेव ध्येय झाल्यामुळे राजकीय पक्षांचा ऱ्हास होत आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदे-अजित पवारांना टोला –

भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “भाजपसोबत राहून कोण जास्त इमानदार आहे, याची स्पर्धा या दोन पक्षांत लागली आहे. मुंबईत भाजप शिवसेनेला सन्मानजनक जागा देईल का? ३० जागा देऊन गप्प बसायला लावेल, हा आरएसएस आणि भाजपचा खेळ आहे. त्यांना शेवटी एकटाच शिलेदार उरलेला हवा आहे.

“मतांची ‘झुंडशाही’ उभी करा –

पैशांच्या राजकारणावर प्रहार करताना आंबेडकर म्हणाले, “एक मत ५ हजार रुपयांना विकत घेतले जात आहे. हा तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न आहे. ज्या दिवशी तुम्ही विकले जाल, त्या दिवशी महात्मा फुलेंचा लढा आपणच गाडला असेल. निवडणुकीत हेराफेरी आणि घोटाळे रोखायचे असतील, तर मतपेटीतून ‘मतांची झुंडशाही’ उभी करणे आवश्यक आहे.

“देशाच्या सुरक्षिततेवर चिंता –

आंबेडकर यांनी यावेळी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. “आर्मी चीफ चीनला शत्रू म्हणतात आणि पंतप्रधान मित्र म्हणतात. सरकार आणि सैन्याची भाषा वेगवेगळी असणे हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. विरोधी पक्ष कमकुवत असल्याने हे प्रश्न संसदेत विचारले जात नाहीत. जर युद्ध टाळायचे असेल, तर मोदींना सत्तेपासून दूर करणे हाच एकमेव मार्ग आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

कोल्हापुरात ‘वंचित’ सर्व जागा लढवणार-

कोल्हापूर शहराध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करत आंबेडकरांनी जाहीर केले की, कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडी प्रत्येक वॉर्डात निवडणूक लढवेल. “आमच्याकडे कार्यकर्ते ताकदवान नसतीलही, पण आम्ही मैदानात जिवंत आहोत. लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आता फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांच्या चळवळीवर आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या महासभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे आगामी निवडणुकीत ‘वंचित’ मोठी मुसंडी मारणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला.


       
Tags: bjpCongressElectionElection commissionKolhapurLocal body electionMaharashtranarendra modipoliticsPrakash AmbedkarVanchit Bahujan Aghadivbaforindiavote
Previous Post

शेतकऱ्याचा ‘किडनी’ विक्रीचा टाहो; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर प्रहार, ‘मतदानाचा पॅटर्न बदलण्याचे’ शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

Aurangabad: नारेगाव येथील कब्रिस्तानच्या जागेसाठी मनपा कार्यालयासमोर आंदोलन तीव्र

Next Post
Aurangabad: नारेगाव येथील कब्रिस्तानच्या जागेसाठी मनपा कार्यालयासमोर आंदोलन तीव्र

Aurangabad: नारेगाव येथील कब्रिस्तानच्या जागेसाठी मनपा कार्यालयासमोर आंदोलन तीव्र

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अमरावतीच्या विकासाचे ‘व्हिजन’ फक्त वंचितकडेच; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल
बातमी

अमरावतीच्या विकासाचे ‘व्हिजन’ फक्त वंचितकडेच; सुजात आंबेडकरांचा प्रस्थापितांवर हल्लाबोल

by mosami kewat
January 7, 2026
0

अमरावती : "अमरावती शहराचा रखडलेला विकास आणि प्रलंबित मूलभूत प्रश्न केवळ वंचित बहुजन आघाडीच मार्गी लावू शकते. शहराचा कायापालट करण्यासाठी...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

वंचित बहुजन आघाडीच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

January 7, 2026
अमरावतीत वंचितचा एल्गार; बडनेऱ्यात सुजात आंबेडकरांच्या सभेला जनसमुदायाचा उदंड प्रतिसाद

अमरावतीत वंचितचा एल्गार; बडनेऱ्यात सुजात आंबेडकरांच्या सभेला जनसमुदायाचा उदंड प्रतिसाद

January 7, 2026
औरंगाबादमध्ये वंचितचा धडाकेबाज प्रचार! प्रा. अंजली आंबेडकर दिवसभरात घेणार ६ जाहीर सभा

औरंगाबादमध्ये वंचितचा धडाकेबाज प्रचार! प्रा. अंजली आंबेडकर दिवसभरात घेणार ६ जाहीर सभा

January 7, 2026
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शक्तिप्रदर्शन

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांचे शक्तिप्रदर्शन

January 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home