Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

mosami kewat by mosami kewat
October 3, 2026
in Uncategorized
0
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 
       
पुणे : ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनेलचे पत्रकार निखिल सुक्रे यांच्यावर १ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दखल घेतली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संबंधित प्रकरणाची माहिती घेत पोलिसांशी फोनवरून संपर्क साधल्यानंतर आरोपीविरोधात पत्रकार संरक्षण कायदा २०१९ मधील कलम ४ अंतर्गत अतिरिक्त कलमाची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

१ ऑक्टोबर रोजी पुण्यात एमपीएससी परीक्षार्थींच्या आंदोलनादरम्यान वार्तांकन करत असताना निखिल सुक्रे यांच्यावर एका विद्यार्थ्याने शिवीगाळ करून मारहाण केली होती. या घटनेनंतर सुक्रे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती.

या प्रकरणात २ ऑक्टोबर रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात CR क्रमांक ४१२ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), २९६, ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग-१ यांच्या न्यायालयाने आरोपीला सुरुवातीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, पुणे शहरातील पत्रकारांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी झोन-१ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होणे योग्य नसून, पत्रकार संरक्षण कायदा २०१९ मधील कलम ४ या प्रकरणात लागू करण्याची सूचना त्यांनी पोलिसांना केली.

यानंतर DCP ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप आणि संबंधित ACP देशमाने यांच्या कार्यवाहीत पत्रकार संरक्षण कायदा २०१९ मधील कलम ४ अतिरिक्त कलम म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास ACP स्तरावर वर्ग करण्यात आला आहे.

आज आरोपीला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत कोठडीत राहणार आहे.

दरम्यान, पत्रकार निखिल सुक्रे यांनी या घटनेबाबत सांगितले की, एमपीएससी आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी ते उपस्थित होते. त्यावेळी एका विद्यार्थ्याने शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती आणि पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्याची विनंती केली होती. सुरुवातीला त्या कायद्याचे कलम गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आले नव्हते. मात्र, आता पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम ४ या प्रकरणात जोडण्यात आले आहे.

Tags: Maharashtra
Previous Post

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 
Uncategorized

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

by mosami kewat
October 3, 2026
0

पुणे : ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनेलचे पत्रकार निखिल सुक्रे यांच्यावर १ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026
तरुणांचा राग रस्त्यावर का?

तरुणांचा राग रस्त्यावर का?

October 3, 2026
पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना

पत्रकार निखिल सुक्रे यांना मारहाण; ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून पोलिसांना कायद्यानुसार कारवाईची सूचना

October 3, 2026
हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

हिटलरची पद्धत RSS ने उचलली; सरकारला फुले, आंबेडकर वाद्यांची ताकद बघायची आहे का? -ॲड. प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home