मनिला : फिलिपाइन्स देशाला अवघ्या दहा दिवसांच्या आत दुसऱ्यांदा एका शक्तिशाली भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. रिश्टर स्केलवर ७.६ एवढी तीव्रता नोंदवलेल्या या भूकंपाने शुक्रवारी सकाळी देशाला हादरवून सोडले. या प्रचंड धक्क्यानंतर तातडीने त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून, किनारी भागातील लोकांना सुरक्षित उंच स्थळी हलवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
फिलिपाइन्स इन्स्टिट्यूट ऑफ ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिंडानाओमधील दावाओ ओरिएंटलजवळ माने शहराच्या किनाऱ्यापासून समुद्रात सुमारे १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
किनारी भागाला मोठा धोका
या शक्तिशाली भूकंपामुळे हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, फिलिपाइन्सच्या किनारी पट्ट्यात तीन मीटरपर्यंत (सुमारे १० फूट) उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. केवळ फिलिपाइन्सच नाही, तर इंडोनेशिया आणि पलाऊ बेटांवरही याचा परिणाम होऊन लाटा येऊ शकतात.
धोका लक्षात घेता, प्रशासनाने किनारी भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना कोणत्याही क्षणी उंच आणि सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन केले आहे.
भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडून रस्त्यावर धाव घेतली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुदैवाने, या बातमीपर्यंत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली
पिंपरी-चिंचवड : प्रदूषणमुक्त पर्याय म्हणून रस्त्यावर आलेल्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बस आता प्रवाशांसाठीच धोकादायक ठरत आहेत की काय, असा प्रश्न पुन्हा...
Read moreDetails