Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

…तर बाळासाहेब संसदेत जावेत, अशी काँग्रेसचीच इच्छा नसल्याचे जनतेला वाटेल

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 20, 2024
in बातमी
0
…तर बाळासाहेब संसदेत जावेत, अशी काँग्रेसचीच इच्छा नसल्याचे जनतेला वाटेल
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

वंचित बहुजन आघाडीचे ट्विट

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या १९ मार्चला झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काॅंगेसविषयी महत्वाचं विधान केलं होतं. त्यालाच पुष्टी जोडत आज वंचित बहुजन आघाडीने एक्स हॅंडलवर एक पोस्ट केली आहे. त्यात वंचितने म्हटले आहे की, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करण्यासाठी काँग्रेसने यापूर्वी दोनदा अकोला लोकसभा मतदारसंघात बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा केला होता. या वेळी अकोल्यात काँग्रेसने बाळासाहेबांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा केला, तर काँग्रेसला देशभरातून पाठिंबा मिळणार नाही. कारण बाळासाहेब निवडून येऊन संसदेत जावेत अशी काँग्रेसची इच्छा नाही हे लोकांच्या लक्षात येईल, असे वंचितने म्हटले आहे.

त्यापूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की, काँग्रेसमध्ये आणि इतर पक्षातील मुस्लीम समाजातील लोकांनी काँग्रेसला सांगितलं आहे की, प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि दोन वेळा मुस्लीम उमेदवार दिल्यामुळे देशभरात काँग्रेसचा जनाधार पुन्हा कमी होणार आहे. यावेळी पुन्हा तुम्ही हा खेळ केला, तर काँग्रेस पक्ष जो आम्हाला जवळचा वाटतो त्याचा स्तर आणखी खाली गेल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा काँग्रेसमधील मुस्लीम आणि जनरल मुस्लीम यांनी काँग्रेसला दिल्याचे म्हटले आहे.


       
Previous Post

भारत जोडो न्याय यात्रा समापन सभा विश्लेषण भाग -2

Next Post

खेड तालुक्यात एका दिवसात वंचितच्या 7 शाखांचे उद् घाटन

Next Post
खेड तालुक्यात एका दिवसात  वंचितच्या 7 शाखांचे उद् घाटन

खेड तालुक्यात एका दिवसात वंचितच्या 7 शाखांचे उद् घाटन

2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार
बातमी

2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार

अहमदाबाद : आयपीएलच्या 2025 चा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. इतिहासात 9 वर्षानंतर पहिल्यांदाच या सामन्यात रॉयल ...

June 3, 2025
संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; ‘वंचित’चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन
बातमी

संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; ‘वंचित’चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन

अकोला : वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा तालुक्याच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. अकोला जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना आणि ...

June 3, 2025
संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; ‘वंचित’चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन
बातमी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना

पुणे : राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य निवडणूक ...

June 3, 2025
Uncategorized

महाराष्ट्रातील जनावरांचे बाजार बंद होणार, गोसेवा आयोगाच्या आदेशाविरुद्ध वंचितचे आंदोलन

अकोला : महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना महाराष्ट्र गोसेवा आयोगाने राज्यभर जनावरांचे बाजार भरवू नयेत असे आदेश दिले आहेत. दि ...

June 2, 2025
दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !
सामाजिक

दलालांनी घेरले, आंबेडकरांनी तारले !

- आकाश मनीषा संतराम स्थळ परभणी. 10 डिसेंबर 2024. मंगळवारचा दिवस होता. पूर्वेला सूर्याची लाली आली होती. कुणी कामावर जाण्याच्या ...

February 15, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क