पिंपरी येथील आंबेडकर चौकात जाहीर “भिक मांगो आंदोलन” आंदोलकांनी थेट पालिका मुख्य प्रवेशद्वारावर मारली धडक..
वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चिंचवडकरांच्या खिशावर दरोडा टाकणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पे अँड पार्क हे धोरण रद्द करण्यासाठी महापालिका मुख्य प्रवेशद्वारावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून सुरू झालेल्या निषेध आंदोलनात पे अँड पार्क या धोरणाविरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या तद्नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकातील सिग्नल वर भिक मांगो आंदोलन करून आंदोलनात सहभागी वंचितच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट महापालिका प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत तीव्र घोषणा दिल्या प्रवेशद्वारावर आंदोलकांना आत जाण्यास मज्जाव केल्यानंतर वंचितचे पदाधिकारी,पोलिस प्रशासन व सुरक्षारक्षक यांच्या मध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाल्यानंतर संतापाने आंदोलकांनी रस्त्यावर जमा केलेली भीक प्रवेशद्वारावर टाकुन आंदोलक तेथुन निघुन गेले.
दरम्यान आठवडा भरापूर्वी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन देत “पे अँड पार्क हे धोरण रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते..दिलेल्या निवेदनावर सात दिवसांच्या आत कारवाई झाली नाही तर आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचितचे शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिला होता.. या वर सात दिवस उलटुन देखील कारवाई झाली नाही हे पाहता आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र असे निषेध आंदोलन करण्यात आले.
वाहन खरेदी करताना आर. टी. ओ. च्या माध्यमातून रोड टॅक्स घेतला जातो,मिळकत करा मध्ये देखील रस्ता सेवा कर घेतला जात असताना पे अँड पार्क अट्टाहास कशासाठी? असा सवाल तायडे यांनी उपस्थित केला. या शहरातील नगरसेवक व आमदार त्यांच्या चेल्या चपाटयांना पाळण्यासाठी त्यांच्या ठेकेदारांना पोसण्यासाठी बहुमताच्या जोरावर असली धोरणे संमत करतात व विरोधी पक्ष देखील यात सहभागी होऊन सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत असे मत इंजि.देवेंद्र तायडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले..जर या महिनाभराच्या आत महापालिका प्रशासनाकडून “पे अँड पार्क” रद्द करण्याची कारवाई झाली नाही तर पे अँड पार्क हे धोरण रद्द होत नाही तो पर्यंत या पेक्षा ही तीव्र असे जन आंदोलन करण्यात येईल असा निर्वाणीचा ईशारा देत जर यावर कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी ज्या ज्या ठिकाणी हे “पे अँड पार्क”लागु करण्यात आले आहे त्या ठिकाणी जाऊन हा प्रकार उधळून लावु निर्वाणीचा ईशारा देखील त्यांनी त्यांच्या मनोगतात पालिका प्रशासनास दिला.
वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे यांच्या नैतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात कार्याध्यक्ष अंकुश कानडी,संजीवन कांबळे,महासचिव राजन नायर, राहुल सोनवणे, प्रवक्ता के.डी.वाघमारे, उपाध्यक्ष धनंजय कांबळे,कचरू ओव्हाळ,किरण हिंगणे,दशरथ शिंदे, असंघटित कामगार आघाडीचे दिनकर ओव्हाळ,सचिव राहुल बनसोडे, इमाम शेख, राजु चांदणे, राजेंद्र साळवे,अप्पू शिवशरण, बाळासाहेब शिवशरण,विनोद बांगर,बिनू वर्घिस,माजी युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील,संतोष जोगदंड,वंचित बहुजन महिला आघाडी कोषाध्यक्षा शारदा बनसोडे,दापोडी शाखा अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, विशालनगर शाखा अध्यक्ष गजेंद्र कांबळे, विठ्ठलनगरचे अमोल माने,घरकुल शाखेचे विजय गेडाम, शशिकुमार टोपे, भीमाशंकर शिंदे,इंद्रसेन गोरे, मंगेश भंडारे,सोनू शेळके,कैलास लोखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.