Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

mosami kewat by mosami kewat
June 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
पाटोदा साठवण तलावामुळे  दलित वस्तीतील १३१ कुटुंबांवर विस्थापनाचे संकट; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
       
जालना : मंठा तालुक्यातील लिंबेवडगाव येथील दलित वस्तीत वास्तव्यास असलेल्या १३१ कायम रहिवासी कुटुंबांवर पाटोदा साठवण तलाव प्रकल्पामुळे विस्थापनाचे संकट ओढवले असून, या कुटुंबांना न्याय मिळावा व गावठाणासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित कुटुंबांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड आदी शासकीय कागदपत्रे असून ते अनेक वर्षांपासून गावातील दलित वस्तीत वास्तव्यास आहेत. पाटोदा साठवण तलावामुळे त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरत असल्याने शासनाने घरे व इतर जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या कुटुंबांना अद्याप पर्यायी जागा किंवा पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय देण्यात आलेला नाही.

ग्रामस्थांनी मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. केला  त्यामुळे या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते ५ वाजेदरम्यान तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या सह रमेश भुतकर, सतीश डोंबे,भागवत होळकर, सिद्धार्थ जाधव, विजय जाधव, दीपक जाधव, श्रीरंग खरात विलास जाधव ,सुदाम जाधव ज्ञानेश्वरहोळकर, आनंदजाधव, बाळूजाधव, बालासाहेबविभुते, रामप्रसाद विभुते, पार्वतीबाई होळकर, त्रिवेणीहोळकर, सुमनबाईहोळकर, सुनिताजाधव , निताजाधव , शोभाबाईजाधव, कालींदापितळे, आशामतीआवचार, सिंधुबाईजाधव, ज्योतीविभुते, बहिणाबाईभुतकरकुशावरता होळकर यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Tags: jalnaMaharashtraVanchit Bahujan Aghadi
Previous Post

हे गढूळ पाणी कोणी पिऊन दाखवलं तर त्याचं गुलाबाचं फूल देऊन सत्कार करतो – पराग गवई

Next Post

अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

Next Post
अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

अमेरिका-इराण सहमतीनामा/ करार: टिकेल, तुटेल की..? 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home